आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीन सिद्दीकीने मुलांसह घराबाहेर काढल्याचा आलियाचा आरोप:पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीनचे प्रत्युत्तर

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोघांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असून हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. शुक्रवारी आलियाने सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर करत पतीने तिला मुलांसह रात्री घराबाहेर काढल्याचा आरोप केला.

या व्हिडिओत आलियाने सांगितल्यानुसार, नवाजुद्दीनने गार्ड्सच्या मदतीने त्यांना घरात शिरु दिले नाही. या व्हिडिओत त्यांची मुलगी शोरा हमसून हमसून रडताना दिसली. आलियाने सांगितले की, तिला आधी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. तेथून परतल्यानंतर मुलांसह तिला घरात प्रवेश नाकारण्यात आला. एक बाप आपल्या मुलांसोबत असा वागू शकतो, यावर विश्वास बसत नाहीये, असे आलिया म्हणाली आहे.

नवाज असा वागेल यावर विश्वास बसत नाहीये - आलिया
व्हिडिओ शेअर करताना आलियाने लिहिले की, '40 दिवस घरात राहिल्यानंतर मला वर्सोवा पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथून परत आल्यानंतर नवाजने गेटवर पहारा लावला आणि मला आणि माझ्या मुलांना रस्त्यावर वाऱ्यावर सोडले. माझ्या मुलीचा विश्वास बसत नाही की, तिचे स्वतःचे वडील असे काही करू शकतात. ती रस्त्यावर रडत आहे. देवाचीच कृपा की, माझ्या एका नातेवाईकाने मला राहण्यासाठी एक खोली दिली. नवाजने जे कृत्य केले त्यावरून तो किती संकुचित मनाचा आहे हे दिसून येते. मला आशा आहे की लवकरच मला न्याय मिळेल."

मुलांसोबत एका खोलीत राहावे लागत आहे..
आलियाने दिव्य मराठीशी संवाद साधताना सांगितले की, "नवाज मला जाणूनबुजून त्रास देत आहे जेणेकरून त्याला मुलांचा ताबा मिळावा. नवाज खूप खालच्या पातळीवर जाऊन वागतोय. गुरुवारी रात्री त्याने आम्हाला बेघर केले. त्यानंतर मी माझ्या भाचीकडे गेले. ती स्वतः मुंबईत तिच्या भावासोबत संघर्ष करत आहे. ती कॉस्च्युम विभागात काम करते. आम्ही तिच्या एका खोलीत आता पाच जण राहतोय."

आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीनचे प्रत्युत्तर
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या प्रवक्त्याने आलियाने लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आलियाने जे काही बोलली ते खोटे असल्याचा दावा प्रवक्तत्याने केला आहे. नवाजुद्दीनने संपत्ती आधीच त्याची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या नावावर केली आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती नाही. त्याच्या आईच्या केअरटेकरने मुलांना घरात येण्याची परवानगी दिली आहे आणि फक्त आलियाला घराच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई आहे. नवाजुद्दीनने आधीच आलियासाठी मुंबईत एक फ्लॅट घेतला होता, जो तिने सध्या भाड्याने दिला आहे, असंही प्रवक्त्याने सांगितले आहे.

आजारी आईला भेटायला गेलेल्या नवाजला भावाने दाखवला बाहेरचा रस्ता...
आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी नवाजुद्दीन भाऊ राहत असलेल्या वर्सोवा येथील बंगल्यावर गेला होता. परंतु भाऊ फैजुद्दीनने त्याला घरात घेतले नाही. बंगल्याच्या गेटवरुनच नवाजला त्याने परत पाठवले. त्यामुळे आजारी आईला बघायला आलेल्या नवाजला तिची भेटही घेता आलेली नाही.

यावर मीडियाने फैजुद्दीनला भावाला का रोखले असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना फैजुद्दीन म्हणाला, "नवाज भाईंची पत्नी आलियाने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अम्मी या गोष्टींमुळे खूप काळजीत आहे, डॉक्टरांनी सांगितले की, तिला विश्रांतीची गरज आहे. मी नवाज भाईंला सांगितले की, अम्मीची सध्या तब्येत ठीक नाही आहे, तुमची केसही कोर्टात सुरू आहे. अम्मीने कोणताही ताण घ्यावा असे आम्हाला वाटत नाही, त्यामुळे आता अम्मीला भेटू नका. जेव्हा नवाज भाईंना अम्मीची प्रकृती ठिक नसल्याचे कळले तेव्हा ते डेहराडूनहून आले, पण अम्मीची तब्येत पाहता आलिया आणि नवाज भाई या दोघांनाही तिच्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या मुलांना आजीला भेटण्यास मनाई नाही," असे फैजुद्दीनने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...