आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझी मुले 45 दिवसांपासून ओलिस आहेत':पुर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीनने सोडले मौन, पहिल्यांदाच मांडली स्वतःची बाजू

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया सातत्याने त्याच्यावर नवनवीन आरोप करत आहे. आता या आरोपांवर पहिल्यांदाच नवाजुद्दीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. नवाजने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, मी गप्प राहिल्याने सर्वच ठिकाणी चुकीचा ठरलो. इतके दिवस मी शांत होतो कारण हा सगळा तमाशा माझी मुले कुठे तरी नक्की वाचतील अशी मला भीती होती.

दुसरी बाजू न ऐकता आणि व्हिडिओजच्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि काही लोकांच्या समुहाने माझ्या चरित्रहननचा आनंद घेतला, असे नवाजुद्दीन म्हणाला आहे.

नवाजने त्याच्या सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे.
नवाजने त्याच्या सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे.

घटस्फोटानंतर केवळ मुलांसाठी आम्ही एकत्र होतो
नवाजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'मी आणि आलिया गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला होता, पण आम्ही मुलांसाठी एकत्र होतो.'

माझी मुले 45 दिवसांपासून ओलीस आहेत...
तो पुढे म्हणाला, 'माझी मुले गेल्या 45 दिवसांपासून भारतात आहेत आणि शाळेत जात नाहीयेत हे कुणाला ठाऊक आहे का? दुसरीकडे, मुले शाळेत गैरहजर असल्याची मला शाळेतून दररोज पत्रे येत आहेत. माझी मुले गेल्या 45 दिवसांपासून ओलिस आहेत, त्यांची दुबईत शाळाही खूप मिस होत आहे,' असे नवाजने सांगितले.

आलियाने नवाजवर आरोप केला होता की, नवाज अहंकारी आहे आणि तो आपली शक्ती आणि पैशांसमोर सर्वकाही विसरला आहे.
आलियाने नवाजवर आरोप केला होता की, नवाज अहंकारी आहे आणि तो आपली शक्ती आणि पैशांसमोर सर्वकाही विसरला आहे.

मुलांची काळजी घेण्यासाठी नवाज गेल्या 2 वर्षांपासून आलियाला महिन्याला 10 लाख पाठवतोय
आलियावर आरोप करताना नवाजने सांगितले की, 'आलियाने पैसे मागण्याच्या बहाण्याने गेल्या 4 महिन्यांपासून मुलांना दुबईत सोडले होते. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी मी तिला गेल्या 2 वर्षांपासून दरमहा 10 लाख देत असे. जेव्हा ती माझ्या मुलांसोबत दुबईला गेली, तेव्हा मी तिला शाळेची फी, मेडिकल आणि प्रवासखर्च सोडून दरमहा 5-7 लाख रुपये पाठवायचो,' असा खुलासा नवाजने केला आहे.

आलियाच्या 3 चित्रपटांना आर्थिक मदत केली, लक्झरी कारही दिली
त्याने पुढे सांगितले, 'मी त्याच्या 3 चित्रपटांना फायनान्स केले होते, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये होती. मी हे केले कारण ती माझ्या मुलांची आई आहे. मुलांसाठी तिला एक लक्झरी कारही दिली, पण तिने ती विकली आणि त्यातून मिळालेले सर्व पैसे तिने स्वतःवर खर्च केले.'

नवाज म्हणाला - मी मुंबईतील वर्सोवा येथे मुलांसाठी सी-फेसिंग अपार्टमेंटही घेतले होते, जेणेकरून मुले व्यवस्थित राहू शकतील. मी त्यांच्यासाठी दुबईत घरही घेतले.

आलियाने नेहमीप्रमाणे यावेळीही पैशांसाठी आरोप केले आहेत - नवाज
'आलियाला फक्त जास्त पैसे हवे होते, त्यामुळे तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर आरोप केले आणि केसही दाखल केली. यापूर्वीही ती अशीच वागली आणि पैसे मिळाल्यानंतर तिने केस मागे घेतली होती,' असे नवाजने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

मुलांना कोणी घरातून कसे बाहेर काढू शकते - नवाज
नवाज पुढे म्हणाला, 'जेव्हाही माझी मुलं सुट्टीत भारतात येतात तेव्हा ते नेहमी त्यांच्या आजीसोबत राहतात. त्यांना कोणी घरातून कसे बाहेर काढू शकेल? त्यावेळी मी स्वतः माझ्या घरात नव्हतो. जर असे घडले तर आलियाने घराबाहेर काढताना व्हिडिओ का बनवला नाही. ती प्रत्येक वेळी रँडम व्हिडिओ का समोर आणत आहे?', असा सवाल नवाजने विचारला आहे.

तिला लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा खराब करायची आहे
नवाज म्हणाला - 'तिने या नाटकात माझ्या लहान मुलांनाही ओढले आहे. हे सर्व करून ती मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा आणि प्रतीमा मलिन करायची आहे.'

आलियाला माझे करिअर उद्धवस्त करायचे आहे. - नवाज
आलियाला माझे करिअर उद्धवस्त करायचे आहे. - नवाज

जगातील कोणत्याही पालकाला आपल्या मुलांनी अभ्यास करू नये असे वाटत नाही
नवाजने नोटच्या शेवटी लिहिले- 'अखेर, कोणत्याही पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास बुडावा किंवा त्यांच्या शिक्षणावर परिणाम व्हावा, असे वाटत नाही. ते नेहमीच आपल्या मुलांना जगातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात.'

माझे शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे - नवाज
'आज मी जे काही कमावत आहे, ते सर्व माझ्या दोन मुलांचे आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. माझे शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी मी भविष्यात कोणत्याही थराला जाऊ शकतो,' असे नवाज म्हणाला आहे.

नवाज म्हणाला - माझा माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
नवाज म्हणाला - माझा माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
आलियाने नवाजच्या आईवर मारहाणीचा आरोप केल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे भांडण सुरू झाले. आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत.

आलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नवाजवर राग व्यक्त करताना दिसली होती. नवाजपासून घटस्फोट घेतल्यानंतरही आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो आणि घटस्फोटानंतरच दुसरे अपत्य जन्माला आले, पण नवाजने कधीही माझा आदर केला नाही, असे आलिया म्हणाली होती. तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे मूल नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे.

आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत. दुसरीकडे, नवाजुद्दीनने सांगितल्यानुसार, तो आणि आलिया फार पूर्वीच वेगळे झाले आहेत.
आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत. दुसरीकडे, नवाजुद्दीनने सांगितल्यानुसार, तो आणि आलिया फार पूर्वीच वेगळे झाले आहेत.

आलियाने नवाजुद्दीनवर दाखल केला बलात्काराचा गुन्हा
नवाजुद्दीन सिद्दीकीवर त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलियाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आलियाने शुक्रवारी सोशल मीडियावर लिहिले होते की, 'नवाजची निर्दयी आई माझ्या निष्पाप मुलाला अनौरस म्हणते आणि हा माणूस गप्प राहतो. काल वर्सोवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार (पुराव्यासह) दाखल केली. काहीही झाले तरी, मी माझ्या निरागस मुलांना या निर्दयी हातात जाऊ देणार नाही,' असे आलिया म्हणाली.

  • आजारी आईला भेटायला गेला नवाजुद्दीन, भावाने दाखवला बाहेरचा रस्ता:घरातील कलहामुळे आईची तब्येत बिघडली, भाऊ म्हणाला...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आईला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री वर्सोवाच्या बंगल्यावर पोहोचला होता. पण त्याचा सख्खा भाऊ फैजुद्दीनने त्याला आईची भेट घेऊ दिली नाही आणि बाहेरचा रस्ता दाखवला. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलियाने नवाज व त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच नवाजचा भाऊ शमासनेही त्याच्यावर आरोप केले होते. घरातील सततच्या वादामुळे आईची प्रकृती बिघडल्याचे नवाजचा भाऊ फैजुद्दीनने सांगितले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

  • पत्नी आणि आईच्या भांडणात अडकला नवाजुद्दीन सिद्दीकी:13 कोटींचे घर सोडून हॉटेलमध्ये मुक्काम, पत्नीने केला आहे हिंसाचाराचा आरोप

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिा सिद्दीकी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. काही दिवसांपासून नवाजुद्दीनची पत्नी आणि त्याची आई मेहरुनिसा यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी त्याची बायको जैनब उर्फ आलियाविरोधात घरात जबरदस्ती घुसल्याविरोधात तक्रार दाखल केली. मेहरुनिसा यांच्या मते आलिया ही नवाजची बायको नाही. तर आलियाने नवाज आणि त्याच्या कुटुंबाविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

बातम्या आणखी आहेत...