आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपी-दिलासादायक बातमी:मुंबईहून मुजफ्फरनगरला परतलेल्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आई आणि दादा-वहिनीलासुद्धा क्वारंटाईन केले गेले 

मुझफ्फरनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाजुद्दीनचे घर मुझफ्फरनगरमधील बुढाणा शहरात आहे.
  • 11 मे रोजी ते मुंबईहून रस्त्या मार्गाने मुझफ्फरनगरला परतला होता. देशात कोरोनाचा संसर्ग मुंबईत सर्वाधिक आहे. त्यामुळे अभिनेत्याने खबरदारी घेत प्रशासनाला त्याच्या आगमनाची माहिती दिली होती.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. नवाजुद्दीनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहेत. मात्र, खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले आहे.

11 मे रोजी मुंबईहून परतला आणि स्वतः दिली प्रशासनाला माहिती 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुझफ्फरनगरमधील बुढाणा शहरातील रहिवासी आहे. वास्तविक, नवाजुद्दीनची आई मेहरूनिसा सध्या आजारी आहेत. आईला तिच्या गावी यायचे होते. म्हणून नवाझुद्दीन 11 मे रोजी महाराष्ट्र सरकारची परवानगी घेऊन त्याच्या घरी पोचला. त्याच्यासमवेत आई, वहिनी सबा आणि  भाऊ फैजुद्दीन होते. घरी पोहोचताच नवाजुद्दीनने आपल्या आगमनाची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती.

सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे

जिल्हा प्रशासनाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाऊईन केले होते.  तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. रविवारी संध्याकाळी उशिरा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नवाजुद्दीनचा भाऊ अयाजुद्दीनने सांगितले की, त्याची बहीण सायनाचे 7 डिसेंबर रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते आणि ईदचा सणही जवळ आला आहे. या कारणास्तव नवाजुद्दीन घरी पोहोचला आहे. एडीएम आलोक कुमार म्हणाले की, सगळ्यांना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...