आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी आईला भेटायला गेला नवाजुद्दीन, भावाने दाखवला बाहेरचा रस्ता:घरातील कलहामुळे आईची तब्येत बिघडली, भाऊ म्हणाला...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सिद्दीकी आईला भेटायला आला होता, मात्र त्याच्या सख्ख्या भावाने त्याला आईला भेटू दिले नाही. - Divya Marathi
नवाजुद्दीन सिद्दीकी आईला भेटायला आला होता, मात्र त्याच्या सख्ख्या भावाने त्याला आईला भेटू दिले नाही.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आईला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री वर्सोवाच्या बंगल्यावर पोहोचला होता. पण त्याचा सख्खा भाऊ फैजुद्दीनने त्याला आईची भेट घेऊ दिली नाही आणि बाहेरचा रस्ता दाखवला. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलियाने नवाज व त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच नवाजचा भाऊ शमासनेही त्याच्यावर आरोप केले होते. घरातील सततच्या वादामुळे आईची प्रकृती बिघडल्याचे नवाजचा भाऊ फैजुद्दीनने सांगितले आहे.

आईचा ताण पाहून नवाजला अडवले - भाऊ फैजुद्दीन
आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी नवाजुद्दीन भाऊ राहत असलेल्या वर्सोवा येथील बंगल्यावर गेला होता. परंतु भाऊ फैजुद्दीनने त्याला घरात घेतले नाही. बंगल्याच्या गेटवरुनच नवाजला त्याने परत पाठवले. त्यामुळे आजारी आईला बघायला आलेल्या नवाजला तिची भेटही घेता आलेली नाही.

यावर मीडियाने फैजुद्दीनला भावाला का रोखले असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना फैजुद्दीन म्हणाला, "नवाज भाईंची पत्नी आलियाने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अम्मी या गोष्टींमुळे खूप काळजीत आहे, डॉक्टरांनी सांगितले की, तिला विश्रांतीची गरज आहे."

"मी नवाज भाईंला सांगितले की, अम्मीची सध्या तब्येत ठीक नाही आहे, तुमची केसही कोर्टात सुरू आहे. अम्मीने कोणताही ताण घ्यावा असे आम्हाला वाटत नाही, त्यामुळे आता अम्मीला भेटू नका. जेव्हा नवाज भाईंना अम्मीची प्रकृती ठिक नसल्याचे कळले तेव्हा ते डेहराडूनहून आले, पण अम्मीची तब्येत पाहता आलिया आणि नवाज भाई या दोघांनाही तिच्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या मुलांना आजीला भेटण्यास मनाई नाही," असे फैजुद्दीनने सांगितले.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ फैजुद्दीनने सांगितल्यानुसार, घरात सुरू असलेल्या कलहामुळे अम्मीची तब्येत बिघडली आहे. यामुळे तिला सध्या कुणालाही भेटायचे नाही.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ फैजुद्दीनने सांगितल्यानुसार, घरात सुरू असलेल्या कलहामुळे अम्मीची तब्येत बिघडली आहे. यामुळे तिला सध्या कुणालाही भेटायचे नाही.

वडिलोपार्जित जमीन भावांच्या नावे केली
दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना गावातील वडिलोपार्जित जमीन त्याच्या भावांच्या नावावर केली आहे. नवाजुद्दीन अचानक मुझफ्फरनगर जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात पोहोचला. त्याने कुलसचिवांसमोर दोन कागदपत्रांवर सह्या केल्या. वडिलोपार्जित जमीन-मालमत्तेतील त्याचा वाटा भावांच्या नावे केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला पोहोचला आणि त्याने आपली वडिलोपार्जित संपत्ती भावांच्या नावावर लिहून दिली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला पोहोचला आणि त्याने आपली वडिलोपार्जित संपत्ती भावांच्या नावावर लिहून दिली आहे.

नवाजुद्दीन आणि माजी पत्नी आलिया यांच्यात कायदेशीर लढाई
गेल्या एक महिन्यापासून नवाजुद्दीन वादात सापडला आहे. त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया आणि भाऊ शमास सिद्दीकी यांनी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाज आणि आलियामधील भांडण आता कोर्टापर्यंत पोहोचले आहे. नवाजसह संपूर्ण कुटुंबाने शोषण केल्याचा आरोप आलियाने केला आहे. दुसरीकडे, नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार, तो आणि आलिया फार पूर्वीच विभक्त झाले आहेत, परंतु आता तिला मालमत्ता आणि बंगला ताब्यात घ्यायचा आहे.

नवाजपासून घटस्फोट झाल्यानंतरही दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि घटस्फोटानंतर त्यांचे दुसरे अपत्य जन्माला आले, मात्र नवाजने कधीही आपला आदर केला नाही, असे आलियाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे अपत्य नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. नवाजने आपली फसवणूक केल्याचे आलियाचे म्हणणे आहे. आलियाने हे सर्व त्याचा बंगला बळकावण्यासाठी केल्याचे नवाजचे म्हणणे आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. नवाजने आपली फसवणूक केल्याचे आलियाचे म्हणणे आहे. आलियाने हे सर्व त्याचा बंगला बळकावण्यासाठी केल्याचे नवाजचे म्हणणे आहे.

आलियाने नवाजवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला
दरम्यान, आलियाने नवाजुद्दीनवर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. आलियाने 24 फेब्रुवारीला सोशल मीडियावर लिहिले की, "नवाजची निर्दयी आई माझ्या निष्पाप मुलाला अनौरस म्हणतेय आणि हा माणूस गप्प राहतो. काल वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार (पुराव्यासह) दाखल केली. काहीही झाले तरी मी माझ्या निरागस मुलांना या निर्दयी माणसाच्या हातात सोपवणार नाही."

एका चित्रपटामुळे भावांमध्ये निर्माण झाला दुरावा
शमास आणि नवाजुद्दीन हे सख्खे भाऊ आहेत. शमासने दिग्दर्शित केलेल्या 'बोले चुडियाँ' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. पण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन्ही भावांमध्ये दुरावा निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते. नवाजुद्दीनने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

नवाजने नातेवाईकांना माझ्या मुलीला भेटू दिले नाही -शमास
शमास सिद्दीकी नुकतात एका मुलीचा बाबा झाला आहे. मुलीच्या जन्मानंतरही नवाज किंवा कुटुंबातील कोणीही त्याच्याशी बोलले नाही, असे त्याने सांगितले. शमास सांगतो की, नवाजने माझ्या मुलीला भेटू नका अशा स्पष्ट सूचना कुटुंबीयांना दिल्या होत्या.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमासनेही नवाजवर निशाणा साधला आहे. शमास म्हणतो की, नवाजने आमच्यासाठी खूप काही केले आहे, पण त्याचे वास्तव काही वेगळेच आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमासनेही नवाजवर निशाणा साधला आहे. शमास म्हणतो की, नवाजने आमच्यासाठी खूप काही केले आहे, पण त्याचे वास्तव काही वेगळेच आहे.

नवाज जसा दिसतो तसा नाही...
शमास म्हणतो की, नवाजुद्दीन जसा जगाला दिसतो तसा नाही. तो म्हणाला, 'नवाज आमची काळजी नक्की घेतो, पण भाऊ म्हणून त्याने आमचे करिअर घडवायला मदत केली नाही. तो आमच्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच खरेदी करतो. पण लोकांच्या मनात त्याची जी प्रतिमा आहे, तसा तो नाही. तो खूप दुष्ट माणूस आहे, जो एका क्षणानंतर लोकांना सोडून देतो. आलिया आणि मी याची उदाहरणे आहोत,' असे शमास सांगतो.