आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालदीवला फिरायला गेलेल्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन:अभिनेता म्हणाला - 'यांनी मालदीवला तमाशा बनवलंय, येथे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि यांना पैसे उडवायचे आहेत'

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिरायला गेलेल्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन सिद्दीकी

करोनाच्या दुस-या लाटेने देशभरात आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वत्र औषधे, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू होतोय. अशी बिकट परिस्थिती असताना अनेक कलाकार मात्र परदेशी जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आणि त्यांच्या सुट्टीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशा कलाकारांवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. या कलाकारांना परिस्थितीची जाणीव नसल्याचे नवाजुद्दीनने म्हटले आहे.

नवाज म्हणाला - थोडी तरी लाज वाटू द्या
नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तेथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आले. यावर व्यक्त होताना तो म्हणाला, 'ते काय बोलणार? अभिनयाबद्दल? या लोकांनी तर मालदीवला तमाशा बनवून ठेवले आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे, हे मला माहित नाही. पण माणुसकीच्या नात्याने तरी तुमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा.'

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, 'येथे प्रत्येकजण मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जे लोक वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत त्यांना असे फोटो दाखवून त्यांचे मन आणखी दुखावू नका,' असे नवाजुद्दीन म्हणाला आहे.

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, 'येथे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि यांना पैसे उडवायचे आहेत. आम्ही जे लोकांची करमणूक करणारे आहोत ना, आम्हाला थोडं मोठं व्हावे लागेल. आम्हाला खूप लोक फॉलो करतात. मग आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायला हवी.'

कुटुंबासह आपल्या गावी आहे नवाजुद्दीन
मुलाखतीत तुम्ही कधी मालदीवला जाणार का, असा प्रश्न नवाजला विचारला असता तो म्हणाला, 'मुळीच नाही, मी इथे बुधानामध्ये माझ्या कुटुंबासोबत राहतो. हेच माझे मालदीव आहे.'

यापूर्वी श्रुती हसननेदेखील व्यक्त केली होती नाराजी
यापूर्वीही अनेक कलाकारांनी बाहेर फिरायला जाणाऱ्या कलाकारांना खडे बोल सुनावले आहेत. श्रुती हसनने वाढत्या कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अशा वेळी सुट्टीवर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नाराजी व्यक्त केली होती. सेलिब्रिटींचे वर्तन असंवेदनशील असल्याचे ती क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती.

श्रुती म्हणाली होती, “मला आनंद आहे की त्यांना एक चांगली सुट्टी मिळाली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वैयक्तिक मला या काळात मास्क न घालता पूलमध्ये मज्जा करणे योग्य वाटत नाही. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे आणि काहींसाठी तर खूपच खडतर. मला वाटतं तुमच्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी तुम्ही आभारी आणि कृतज्ञ असायला हवे. तुमच्याकडील सुखसोयींचा लोकांसमोर दिखावा करण्याची ही गरज नाही,' असे म्हणत सोशल मीडियावर सुट्टीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर तिने निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...