आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता स्पष्ट केले की, तो यापुढे चित्रपटांत केवळ मुख्य भूमिकाच साकारणार आहे. यासाठी त्याला स्वतः पैसा गुंतवावा लागले तरी चालेल. चित्रपटात त्याला नायक म्हणून दाखवले पाहिजे असे नाही, तर त्याचे पात्र महत्त्वाचे असले पाहिजे, असे नवाज म्हणाला आहे. याशिवाय सलमान आणि शाहरुखसोबत काम करण्याबाबतही तो बोलला आहे.
डीएनएला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला- 'मला सलमान किंवा शाहरुखसोबत काम करायचे नाही, असे नाही. यापूर्वीही या इंडस्ट्रीत लीड आणि साइड रोलमध्ये फरक होता. जगातील कोणतीही चित्रपट इंडस्ट्री असो, यामुळे फरक पडत नाही. पण इथे सहाय्यक भूमिका फक्त नावापुरत्याच ठेवल्या जातात.'
नायक किंवा खलनायक नव्हे तर चांगल्या भूमिकेच्या शोधात
'मी कसा तरी इंडस्ट्रीत तारला गेलोय, पण आता मला ती चूक पुन्हा करायची नाही. मला चित्रपटात स्वतःचे पैसे गुंतवावे लागले तरी चालतील, पण आता यापुढे मी मुख्य भूमिकाच करणार आहे. मी हिरोपंती 2 मध्येही काम केले आहे. हा चित्रपट जरी चांगला चालला नसला तरी तिथेही मी मुख्य भूमिकेत होतो. आता मी मोठ्या चित्रपटांमध्ये अशा भूमिका शोधते,' असे नवाजुद्दीनने सांगितले.
नवाजला छोट्या भूमिका करायच्या नाहीत
नवाजुद्दीन म्हणाला की, आता छोट्या भूमिका त्याला करायच्या नाहीत. आता त्याच्या भूमिकेला विशेष महत्त्व असायला हवे. मग ती भूमिका नायकाची असो वा खलनायकाची यामुळे त्याला काही फरक पडत नाही.
'अफवा'ला कमी स्क्रीन मिळाल्याने नवाज निराश
नवाजुद्दीन सध्या 'अफवा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. खरं तर हा चित्रपट फार कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे नवाज खूपच निराश झाला आहे. यावर तो म्हणाला, 'जर तुम्ही चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करत असाल तर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता कमी स्क्रीन मिळाल्याने चित्रपट चांगले कलेक्शन करू शकणार नाही. यानंतर लोक म्हणतील की चित्रपट चालत नाही,' अशा शब्दांत नवाजने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आजही नवाज चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नर्व्हस होतो
नवाजुद्दीन सिद्दीकी दोन दशकांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण आजही जेव्हा त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा तो नर्व्हस होतो. याबद्दल बोलताना नवाज म्हणाला, 'आपला चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. आता प्रेक्षकांना तुमचे काम किती आवडते, तुम्ही कितपत यशस्वी होतात, हे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून असते,' असे नवाजने सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.