आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीविरोधात FIR:नवाजच्या आईनेच दाखल केली तक्रार, मालमत्तेवरून वाद; पोलिसांनी लावली अनेक कलमे

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी नवाजची पत्नी आलियाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावले आहे. नवाजची आई आणि पत्नी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होता. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी भादंवि कलम 452, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीचे खरे नाव अंजना किशोर पांडे होते. पण लग्नानंतर तिने नाव बदलून आलिया जैनब केले.

सासू आणि सूनामध्ये कडाक्याचे भांडण
रिपोर्ट्सनुसार, नवाजची पत्नी आणि आईमध्ये जोरदार वाद झाला होता. नवाजच्या आईने याबाबत तक्रार करण्यासाठी मेहरुनिसा पोलिस स्टेशन गाठले आहे. 2020 मध्ये आलियाने नवाजच्या कुटुंबावरही मारहाणीचा आरोप केला होता.

आलियाने सांगितले की, नवाजचा भाऊ शम्स सिद्दीकी याने तिच्यावर अत्याचार केला होता आणि याच कारणामुळे तिने नवाजला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीसही पाठवली होती.

एफआयआरवर आश्चर्य
आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून तिच्याविरुद्धच्या एफआयआरवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तिने लिहिले की, 'जेव्हा मी माझ्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करते, तेव्हा पोलिस त्याकडे लक्ष देत नाहीततर नवऱ्याच्या घरात प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. मला कधी न्याय मिळेल का?' आलियाने या पोस्टसोबत एफआयआरची प्रतही जोडली आहे.

आलियाने 2021 मध्ये घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला
2021 मध्ये आलियाने नवाजला घटस्फोट देण्याचा निर्णय बदलला. ती म्हणाला की, नवाजच्या वागण्यात खूप बदल झाला आहे, त्यामुळेच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला आहे. आम्ही दोघे मतभेद सोडवू. कारण आम्हाला मुलांचे भविष्यही पाहायचे आहे. नवाजुद्दीन आणि आलियाला दोन मुले आहेत.

नवाजने पत्नीला साथ दिली
नवाजला आलियाबद्दल विचारण्यात आल्यानंतर तो म्हणाला की, "मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही. मी नकारात्मकतेलाही माझ्याभोवती फिरू देत नाही. ती अजूनही माझ्या मुलांसोबत आहे. आम्ही 10 वर्षे एकत्र घालवली आहेत. काहीही झाले तरी मी तिला सदैव साथ देईन.

नवाज पुढील चित्रपटात ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलयचे झाले तर तो लवकरच हड्डी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे नूरानी चेहरे, टीकू वेड्स शेरू आणि जोगीरा सारा रा रा सारखे प्रोजेक्ट आहेत.

हड्डी या चित्रपटात नवाज पूर्णपणे नवीन आणि वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. व्यक्तिरेखेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी ट्रान्सजेंडर लोकांसोबत वेळ घालवला होता.

बातम्या आणखी आहेत...