आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर आलिया सिद्दीकीचे गंभीर आरोप आहेत, वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलिया सिद्दीकी हे नवाजुद्दीनच्या पत्नीचे नाव आहे.
  • 27 जुलै रोजी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. परंतु अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याचा भाऊ आणि कुटुंबातील काही सदस्यांविरूद्ध मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी अंजना आनंद किशोर पांडे उर्फ ​​आलिया सिद्दीकीने 27 जुलैला एफआयआर दाखल केला आहे. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वी, आलियाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठविली होती. सोबतच पोटगीचीही तिने मागणी केली आहे.

वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भांदवी कलम 354, 323 (जाणूनबुजून एखाद्याला दुखापत पोहोचवणे), 504 (शांततेचा भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान करणे), 506 (धमकावणे) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • नवाजुद्दीन सिद्दीकीवर भावाची चूक लपवल्याचा आरोप

आलियाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, "माझ्या पुतणीने मला सांगितले होते की तू मला माझ्या लहान काकांसोबत (नवाजचा धाकटा भाऊ) सोबत पाठवत जाऊ नकोस. तो माझ्यासोबत गैरवर्तन करतो, तो मला आवडत नाही. त्यावेळी पहिल्यांदा मला शंका आली होती." आलियाने नवाजुद्दीनचा धाकटा भाऊ मिनाजुद्दीन सिद्दीकीवर हा गंभीर आरोप केला आहे.

आलियाने आपल्या तक्रारीत पुढे सांगितले की, तिचा दीर मिनाजुद्दीन सिद्दीकीने 2012 मध्ये तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केले होते आणि तिला अश्लील क्लिप दाखवली होती. आलियाने सांगितल्यानुसार, तिने मिनाजुद्दीनवर याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याने तिला मारहाण केली होती.

एफआयआरनुसार नवाजुद्दीन त्यावेळी तिच्यासोबत नव्हता. तो मुंबईत होता. तिने ही माहिती मुंबईत जाऊन नवाजुद्दीनला दिली होती. माझे करिअर आताच सुरु झाले आहे, यामुळे त्याच्या कारकीर्दीवर वाईट परिणाम होऊ शकतो. या गोष्टी घराच्या चार भींतीतच राहाव्यात असे नवाजुद्दीनने आलियाला म्हटले होते.

  • सासू-सास-यांवरही लावले आरोप

याशिवाय आलियाने तिचे सासरे फैय्याजुद्दीन, अयाजुद्दीन आणि सासू मेहरून्निसा यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आलियाने असेही म्हटले आहे की, तिचा नवरा आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने तिला तक्रार करण्यापासून रोखले होते.