आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अंधेरी कोर्टाची नोटीस:पत्नी आलियाचे गंभीर आरोप, वाद चिघळणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकीने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई न्यायालयाने अभिनेत्याला नोटीस बजावली आहे. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी आलियाविरोधात एफआयआर दाखल केला. आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यात गेल्यावर तिथे तिचा अभिनेत्याच्या आईसोबत वाद झाला होता. त्यानंतर आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी तिच्यावतीने 509 आणि घरगुती हिंसाचारअंतर्गत अंधेरी न्यायालयात केस दाखल केली. आता मुंबईच्या अंधेरी कोर्टाने नवाजच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून अभिनेत्याला नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकरणांवर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे.

आलियाच्या वकिलांनी काय सांगितले?
आलियाच्या वकिलांनी सांगितले की, 'मी नवाझुद्दीन सिद्दीकीच्या कागदपत्रांच्या स्वीकृतीनुसार सांगत आहे की, आलिया त्याची कायदेशीररित्या विवाहित पत्नी आहे. तोही सर्वत्र हेच म्हणतो आणि जर हे खरे असेल, तर अत्याचाराचे कोणतेही कारण नाही. सासूच्या विरोधात गेल्यावर आलियासाठी हे सर्व केले गेले. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर आता अंगरक्षक आहेत, जे आलियाला वरच्या खोलीत बाथरूममध्ये जाण्यापासून तिला रोखत आहेत. याचा अर्थ असा की, त्यांची गैरवर्तनाची तक्रार बिनबुडाची असून नवाजला दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडण्यात आले आहे.'

नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आलियाचा छळ
रिझवान सिद्दीकी यांनी याआधी आपल्या निवेदनात म्हटले होते की, 'नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझी क्लायंट आलिया सिद्दिकीला घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यांनी आलियाचा खूप छळ केला आणि तिच्याविरोधात फौजदारी खटला दाखल केला. त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी आलियाला अटक करण्याची आणि रोज संध्याकाळी पोलिस ठाण्यात येण्याची धमकी दिली.'

आलियाला सात दिवसांपासून जेवण मिळाले नाही
रिझवान सिद्दीकी सांगतात, 'नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या क्लायंटला सात दिवसांपासून जेवण दिले नाही. झोपायला पलंग आणि वापरायला बाथरुम दिले नाही. त्यांनी आलियाभोवती अनेक अंगरक्षकही तैनात केले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. सध्या माझी क्लायंट तिच्या मुलांसह हॉलमध्ये राहात आहे.'

मालमत्तेवरून सुरु आहे वाद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि नवाजच्या आईमध्ये मालमत्तेवरून वाद सुरु आहे, त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. काही दिवसांपूर्वी नवाजच्या आईने आलियाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भादंवि कलम 452, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नवाजुद्दीनच्या पत्नीचे खरे नाव अंजना किशोर पांडे होते, मात्र लग्नानंतर तिने तिचे नाव बदलून आलिया जैनब ठेवले.

बातम्या आणखी आहेत...