आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अलीकडेच त्याच्या फ्लॉप झालेल्या चित्रपटांवर प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीन म्हणतो की, त्याचे चित्रपट फ्लॉप झाले तरी तो घाबरत नाही. चित्रपट चालो अथवा नाही पण नवाजुद्दीन सिद्दीकी चालणारच असे तो म्हणाला. नवाज सध्या त्याच्या आगामी हड्डी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रफटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत नवाज व्यक्त झाला आहे.
चित्रपट फ्लॉप झाला तर सर्व दोष अभिनेत्याला दिला जातो
नवाजुद्दीन अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना म्हणाला- "पिक्चर चालो अथवा नाही, पण नवाजुद्दीन सिद्दीकी तर नक्कीच चालणार. याचे कारण म्हणजे मी कधीही हार मानत नाही. मी कधीही मेहनत करण्यापासून मागे हटत नाही. यासह बाकी सगळ्याच गोष्टी मी माझे काम प्रामाणिकपणे करत आहे की नाही यावर अवलंबून आहेत. काहीवेळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाही याची अनेक कारणे असतात. अनेकदा एखादा चित्रपट फ्लॉप झाला तर आपण दिग्दर्शकाऐवजी अभिनेत्याला दोष देतो. या अभिनेत्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला, असेच लोक म्हणतात."
दिग्दर्शकावर कुणीही प्रश्न उपस्थित करत नाहीत
नवाजुद्दीन पुढे म्हणाला- "उदाहरणार्थ, जेव्हा शाहरुख खानसारखा स्टार ज्याचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. जर तो एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारात असेल आणि दुर्दैवाने त्याचा चित्रपट अपयशी झाला तर दोष त्याचा नाही. कारण त्याने दिग्दर्शकाला त्या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपलब्ध करून दिले असतात. पण तरीही जर तो चित्रपट अपयशी झाला, तर त्याचा दोष दिग्दर्शकाला किंवा त्या चित्रपटाच्या कथेचा दिला जात नाही," असे नवाज म्हणाला.
नवाज पुढील चित्रपटात ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर तो लवकरच 'हड्डी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे नुरानी चेहरे, टिकू वेड्स शेरू आणि जोगिरा सारा रा रा हे प्रोजेक्ट आहेत. हड्डी या चित्रपटात नवाज पूर्णपणे नवीन आणि वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्याने काही दिवस ट्रान्सजेंडर लोकांसोबत घालवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.