आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला असून पुन्हा एकदा त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. नवाज आणि आलिया यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तसं पाहता नवाजच्या खासगी आयुष्यावर एक नजर टाकली असता, त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.
19 मे, 1974 मध्ये उत्तर प्रदेशातील एक लहानसे गाव बुढानामध्ये त्याचा जन्म झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी एका सामान्य भारतीयाप्रमाणे दिसतो. परंतू त्याचा अभिनय उत्तम आहे. जवळपास 15 वर्षांच्या संघर्षानंतर तो बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवू शकला आहे. एकेकाळी वॉचमन असणारा नवाज आजही वेळ काढून आपल्या गावी जाऊन शेती करतो.
'गँग्ज ऑफ वासेपुर' मधून मिळाली ओळख
नवाजने 1999 मध्ये आलेल्या 'सरफरोश' मधून करिअरची सुरुवात केली. यामध्ये त्याची भूमिका छोटी होती. त्याच्या करिअरच्या या सुरुवातीविषयी कुणाला फारशी माहिती नव्हती. 2012 पर्यंत नवाजने अनेक लहान-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतू त्याला विशेष ओळख मिळाली नाही. यानंतर अनुराग कश्यप त्याला फैजलच्या भूमिकेतून 'गँग्ज ऑफ वासेपुर' मध्ये घेऊन आला आणि फैजलच्या भूमिकेने नवाजला घराघरात ओळख मिळाली. आता नवाज इंडस्ट्रीच्या टॉप अॅक्टर्सपैकी एक आहे. भूमिका कोणतीही असो, नवाज त्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देतो. नवाजला ही किमया कशी साधता येते, असा प्रश्न अनेकदा त्याच्या चाहत्यांना पडतो.
नवाजला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला, तर तो म्हणाला होता की, मी माझ्या गावी जातो आणि आपल्या शेताची देखरेख करतो. काही दिवस तिकडे शेती करतो. नवाजुद्दीननुसार, असे केल्याने त्याच्या मनाला समाधान मिळते. यानंतर तो नवीन भूमिकेच्या तयारीला लागतो.
नवाजुद्दीनला आहेत 9 भाऊ-बहीण
नवाजुद्दीननुसार, आम्ही सात भाऊ आणि दोन बहिणी आहोत. वडील शेतकरी होते. घरात चित्रपटांचे नाव घेणेही चांगले समजले जात नव्हते. म्हणजेच आयुष्याचा संघर्ष एवढा मोठा होता की, चित्रपटांविषयी विचार करायला वेळ नव्हता. सर्व आई-वडिलांच्या इच्छा असते त्याप्रमाणे माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी खुप शिकून मोठं व्हावे. कोणता अभ्यास चांगला असतो याविषयी त्यांना माहिती नव्हती. परंतू आम्ही हुशार व्हावं यासाठी ते नेहमी प्रोत्साहित करायचे.
फॅक्टरीमधील जॉबपासून वॉचमनची नोकरीही केली
अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत गुरुकुल कांगडी यूनिव्हर्सिटीमधून सायन्समध्ये त्याने ग्रॅज्यूएशन केले. तरीही नोकरी मिळाला नाही. तर दोन वर्षे भरकटत राहिलो. बडोदाची एक पेट्रोकेमिकल कंपनी होती, त्यामध्ये दीड वर्षे काम केले. ती नोकरी भयानक होती. अनेक प्रकारच्या केमिकल टेस्टिंग कराव्या लागात होत्या. यानंतर जॉब सोडला. दिल्लीला गेलो आणि नवीन नोकरी शोधू लागलो. वॉचमनची नोकरीही केली, असे नवाज सांगतो.
हेच ते काम आहे, जे मला करायचे होते
काम तर मिळाले नाही, परंतू एकदा मित्रासोबत नाटक पाहायला गेलो. प्ले पाहून आनंद झाला. यानंतर अनेक नाटकं पाहिली. हळुहळू रंगमंच आवडायला लागला. मग स्वतःला म्हणालो, यार! हीच ती गोष्ट आहे, जी मला करायची आहे. काही काळानंतर एक ग्रुप जॉइन केला, तिथे साक्षी, सौरभ शुक्ला यांच्याशी ओळख झाली. तेव्हा नाटकांशी जोडलो गेलो. परंतू थिएटरमध्ये पैसे मिळत नव्हते. रोजचा खर्च भागवणे अवघड होत होते. संध्याकाळच्या जेवणाचा खर्च निघावा यासाठी वॉचमनची नोकरी करायला लागलो, असे नवाजने सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.