आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि आईच्या भांडणात अडकला नवाजुद्दीन सिद्दीकी:13 कोटींचे घर सोडून हॉटेलमध्ये मुक्काम, पत्नीने केला आहे हिंसाचाराचा आरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिा सिद्दीकी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. काही दिवसांपासून नवाजुद्दीनची पत्नी आणि त्याची आई मेहरुनिसा यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी त्याची बायको जैनब उर्फ आलियाविरोधात घरात जबरदस्ती घुसल्याविरोधात तक्रार दाखल केली. मेहरुनिसा यांच्या मते आलिया ही नवाजची बायको नाही. तर आलियाने नवाज आणि त्याच्या कुटुंबाविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.

जोपर्यंत प्रकरण निवळत नाही, तोपर्यंत हॉटेलमध्ये राहणार नवाज

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, आई आणि बायकोमध्ये सुरू असलेल्या भांडणाला कंटाळून नवाजुद्दीन त्याचे आलिशान घर सोडून हॉटेलमध्ये रहायला गेला आहे. नवाजुद्दीनच्या जवळच्या मित्राने सांगितले की, जोपर्यंत त्याचे वकील घरावरून निर्माण झालेली कायदेशीर समस्या सोडवत नाही तोपर्यंत तो हॉटेलमध्येच राहणार आहे. दरम्यान नवाजुद्दीन गेल्याचवर्षी अंधेरी इथल्या यारी रोडवर त्याचा आलिशान बंगल्यात राहायला गेला.

'नवाब' असे आहे नवाजच्या घराचे नाव
या बंगल्याला नवाजने त्याच्या वडिलाचे नाव दिले आहे. नवाब असे या आलिशान घराचे नाव आहे. या घरात सहा बेडरूम, दोन मोठे हॉल आणि दोन लॉन आहेत. या घराच्या रिनोव्हेशनला तीन वर्षे लागली होती. नवाजने 10 कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी केली होती. तर तीन कोटी रुपये घर बनवण्यासाठी आणि त्याच्या इंटेरिअरवर खर्च करण्यात आले.

आलियाचे नवाज आणि त्याच्या कुटुंबावर आरोप
दरम्यान, नवाजुद्दीनच्या आईने आलियावर अनेक आरोप केले. त्यात ती नवाजची बायकोच नाही असा गंभीर आरोपदेखील केला. तर दुसरीकडे आलियानेदेखील कायदेशीर आधार घेत नवाज आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. आलियाने नवाज आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला जेवण आणि अगदी बाथरूम वापरण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप करत कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.

आलियाने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत नवाज आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रारही दाखल केली. त्यानंतर पत्नी आलियाने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबईच्या अंधेरी न्यायालयाने नवाजला नोटीस बजावली आहे.

'हड्डी'मध्ये ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे नवाज

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर तो लवकरच 'हड्डी' चित्रपटात दिसणार आहे. 'हद्दी'मध्ये नवाज पूर्णपणे नवीन आणि वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमिकेच्या तयारीसाठी नवाजने काही काळ ट्रान्सजेंडर लोकांसोबत घालवला होता. याशिवाय तो 'नूरानी चेहरे', 'टिकू वेड्स शेरू' आणि 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.