आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपरती:नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी पुर्वाश्रमीच्या पत्नीचे पत्र, म्हणाली - 'मी सर्व केस मागे घेत आहे, आता आपण चांगले पालक होऊ'

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. त्यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पण आता आलियाने इन्स्टाग्रामवर नवाजसाठी एक पत्र लिहित सर्व केस मागे घेत असल्याचे सांगितले आहे. आलियाने एक लांबलचक पत्र लिहिले आहेत. यात तिने स्वतःच्या चुका स्वीकारत नवाजच्या चुका माफ करत असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर भविष्यात आपण चांगले पालक होऊ असेही म्हटले आहे.

नवाज आणि आलियाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुले दुबईत शिक्षण घेत आहेत. न्यायालयाने मुलांची कस्टडी आलियाला दिली आहे. खरं तर नवाज कौटुंबिक वादाविषयी बोलणे टाळले, पण आलियाने वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील वाद सार्वजनिक केले.

आता आपल्या पत्रात आलिया काय म्हणाली वाचा -

आलिया सिद्दीकीने पती नवाजला इंस्टाग्रामवर एक पत्र लिहिले आहे, त्यात ती म्हणाली की, 'नमस्कार नवाज..... नवाज, हे पत्र तुझ्यासाठी आहे, मी अनेक ठिकाणी ऐकले आणि वाचले आहे की आयुष्य हे पुढे जाण्यासाठीच असते. गेल्या काही महिन्यांत आपल्या दोघांमध्ये जे काही घडले, त्या सर्व गोष्टी मी विसरून जाईन, माझा देवावर विश्वास आहे, त्याच्या प्रेरणेने माझ्या चुकांची माफी मागेन, तुझ्या चुका माफ करून पुढे जाऊन भविष्य चांगले करण्याचा प्रयत्न करेन. भूतकाळात अडकणे हे चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा भूतकाळ मागे सोडून अशा चुका पुन्हा न घडवण्याचे वचन देऊन मुलांचे भविष्य घडवूयात..'

'माझी सगळी लढाई केवळ मुलांसाठी होती'
तिने पुढे लिहिले की, 'तू एक चांगला वडील आहेस आणि आशा करते की पुढे सुद्धा तू एक चांगला पिता असण्याची सर्व कर्तव्ये पार पाडशील. मुलांना चांगले आणि उत्कृष्ट भविष्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुयात. माझी सगळी लढाई फक्त आपल्या मुलांसाठी होती. त्याच्या चेहऱ्यावरील हास्याचा आकार पाहून माझ्या सर्व राग आणि काळजीचा आकार निमूळता झाला आहे. नवाज, आपण बराच काळ एकत्र घालवला आहे, आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि सर्व परिस्थितीत आपण जिंकलो आहोत. म्हणूनच मला आशा आहे की तू आत्ता तुझ्या करिअरला खूप उच्च पातळीवर नेशील. मी माझ्या देवाजवळ प्रार्थना करते की, तो तुला यशाच्या नवीन शिखरांसाठी आशीर्वाद देईल.'

'मी सर्व केस परत घेतेय'
ती पुढे लिहिते, 'गेल्या काही काळात माझ्या विचार आणि समजून घेण्याच्या पद्धतीला वेगळी दिशा दिली आहे. माझ्या देवाने मला नेहमीच एक चांगली व्यक्ती बनायला शिकवले आहे. म्हणूनच माझा देव आणि माझे अंतर्मन मला नेहमी सांगते की मी तुझ्यावर किंवा तुझ्या कुटुंबावर केलेले सर्व केस परत घ्यावेत. देवाच्या सामर्थ्याने आणि मार्गदर्शनाने मी ते सर्व केस मागे घेत आहे. मला तुझ्याकडून आर्थिक मदतीची गरज नाही आणि मला तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. जर देवाने हे जीवन दिले असेल तर तो मला भविष्यात जीवन जगण्याचा मार्ग नक्कीच दाखवेल. माझे कृत्य मला माझ्यासाठी चांगले भविष्य ठरवण्यास मदत करेल.'

'आपण चांगले पालक होऊ'
पुढे ती म्हणाली, 'फक्त एकच गोष्ट आहे की, माझ्या घरातला माझा हिस्सा मला विकायचा आहे आणि माझ्या चित्रपट निर्मितीदरम्यान पैसे देऊन लोकांना दिलेली आश्वासने मला पूर्ण करायची आहेत. कारण माझ्या आतला माणूस मला कोणाशीही बेईमानी करू देत नाही. म्हणूनच त्यांना पैसे देऊन मला मोकळे व्हायचे आहे. शेवटी फक्त एवढीच प्रार्थना की तुझे आरोग्य चांगले राहो, तुझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहो, तू आपल्या मुलांचीसुद्धा चांगली काळजी घे, हीच प्रार्थना. आपण चांगले पती-पत्नी बनवू शकलो नाही, पण आशा आहे की आपण चांगले पालक होऊ. आता आयुष्यात जे काही घडले त्यासाठी एकमेकांना माफ करुन आयुष्याच्या वाटेवर पुढे जाऊ. तू सदैव आनंदी राह,' असे आलिया म्हणाली आहे.

आता आलियाच्या या पत्रावर नवाजुद्दीन सिद्दीकी काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.