आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे कौटुंबिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. अलीकडेच नवाजची पत्नी आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देणार असल्याचे तिने सांगितले आहे. सोबतच नवाजचा भाऊ शमाससोबतचे सर्व मतभेद मिटवायचे आहेत, असेही आलिया म्हणाली आहे. आता आलियाच्या वक्तव्यावर शमासची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका मुलाखतीत शमास म्हणाला, 'नवाज एक चांगली व्यक्ती आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणालाही दुखव नाहीत. माझे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. त्यांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे सर्व कुटुंबाला माहित आहे. नवाज भाई कुटुंबातील प्रमुख आहेत आणि त्यांच्यासाठी जे काही चांगले आणि योग्य असेल ते आम्ही करू,' अशी प्रतिक्रिया शमासने दिली आहे.
आलियाने लावला होता छेडछाडीचा आरोप
गेल्या वर्षी मे महिन्यात आलियाने नवाजवर बलात्कार आणि फसवणूकीचा आरोप करत लेखी तक्रार दिली होती. मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात तिन तक्रार दाखल केली होती. आलियाने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला होता.
नवाजुद्दीनचा भाऊ शमासवरही आलियाने छेडछाड केल्याचा आरोप केला होता. आलिया हे सर्व पैशांसाठी करत असल्याचा दावा शमास याने केला होता. मात्र, एका मुलाखतीत आलियाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
आलियाने मन बदलले
आलियाने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने नवाजसोबत पुन्हा संसार करण्याची इच्छा व्यक्त केली. आलियाने सांगितले होते, 'मला कोरोनाची लागण झाली. मी माझ्या
घरात आयसोलेट आहे. अशात दोन्ही मुलांची काळजी घेण्यास खूप अडचण आली असती. मात्र, नवाजने मला पाठिंबा दिला. नवाज सध्या लखनौमध्ये कोणत्यातरी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
असे असतानाही तो आमची मुलगी शोरा आणि मुलगा यानी यांची काळजी घेत आहे.'
'तो सातत्याने मला फोन करून मुलांबाबत विचारत होता. याशिवाय माझ्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठीही त्याने फोन केला आणि माझी काळजी घेतली. त्याच्या या वर्तणूकीमुळे मी फार आनंदी आहे. त्याचा हा व्यवहार मला भावला आणि आमच्याबाबत त्याची काळजी पाहून मी हैराण आहे. मी आणि नवाज वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार. तसेच आमच्यात सध्या सोबत राहण्याबाबतही बातचीत होत आहे,' असे तिने सांगितले.
यापूर्वी नवाजवर केले होते गंभीर आरोप
नवाजला घटस्फोटाची नोटिस पाठवल्यानंतर आलियाने एका मुलाखतीत बोलताना नवाजवर गंभीर आरोप केले होते. तिने म्हटले होते की, 'आमचे लग्न होणार होते तेव्हा नवाज दुसऱ्या व्यक्तीसोबत
रिलेशनशिपमध्ये होता. याबाबत लग्नापूर्वी आणि त्यानंतरही आमच्यात खूप भांडण झाले. तसेच जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा मला चेकअपसाठी एकटीलाच जावे लागत होते. माझ्या डॉक्टरांनी मला
सांगितले होते की, मी एक वेडी आहे आणि पहिली महिला आहे जी डिलिव्हरीसाठी एकटी आली आहे. मला जेव्हा प्रसूतीवेदना सुरु झाल्या तेव्हा माझा पती माझ्यासोबत नव्हता. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत होता. मला हे सर्व माहित आहे कारण माझ्याजवळ फोन बिलचे स्टेटमेंट आहेत,' असा आरोप आलियाने केला होता.
नवाजने दिली होती प्रतिक्रिया
नवाज म्हणाला, 'मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही सांगायला आवडत नाही. मला माझ्याभोवती नकारात्मकता आणि द्वेष नको आहे. आलिया अजूनही माझ्या मुलांची आई आहे आणि आम्ही एकत्र अनेक वर्षे घालवली आहेत. काहीही झाले तरी मी तिला पाठिंबा देईल. तिची आणि मुलांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. आलिया आणि माझी मतं जुळत नाहीत, मात्र आमच्यासाठी आमची
मुले सर्वप्रथम आहेत.
आमच्यातील मतेभेदांचा परिणाम मुलांवर व्हायला नको. नातेसंबंधात ताणतणाव असतोच. मला एक चांगला पिता व्हायचे आहे. मी नेहमीच माझ्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहीन. नवाज आणि आलिया यांना दोन मुले आहेत. या दोघांच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.