आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम:नवाजुद्दीन सिद्धीकीच्या भावावर पुतणीने लावला लैंगिक शोषणाचा आरोप,  एफआयआरमध्ये सांगितले - त्यावेळी मी 9 वर्षांची होते

मुंबई (अमित कर्ण)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी दिल्लीच्या जामिया नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
  • पुतणीचा आरोप, लग्नाआधी काकाने शारीरिक संबंधाची मागणी केली होती.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच भाऊ मिनाजवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनच्या पुतणीनेच हे आरोप केले आहेत. या प्रकरणी, दिल्लीतील जामिया नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवाजच्या पुतणीने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला आहे. नवाजची पुतणी दिल्ली येथील जामिया नगरमध्ये आपल्या पतीबरोबर वास्तव्याला आहे.

दिव्य मराठीसोबत बोलताना या तरुणीने आपबीती सांगितली आहे. मी दोन वर्षांची असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि सावत्र आईने माझा खूप छळ केला, असे नवाजच्या पुतणीने सांगितले आहे. 

  • वयाच्या 9 व्या वर्षापासून सुरु होते शोषण

नवाजच्या पुतणीने सांगितल्यानुसार,  तिचा काका मीनाजने ती नऊ वर्षांची असल्यापासून तिचे शारीरिक शोषण सुरु केले होते. हे तिच्या लग्नाआधीपर्यंत सुरु होते. त्यावेळी मी लहान असताना मला समजले नाही, पण आता मला कळतंय की तो स्पर्श चुकीचा होता. माझे लैंगिक शोषण करण्यात आले होते, असा खुलासा तिने केला आहे. 

नवाजची पुतणी साशाने दिव्य मराठीसोबत एफआयआरची कॉपी शेअर केली आहे.
नवाजची पुतणी साशाने दिव्य मराठीसोबत एफआयआरची कॉपी शेअर केली आहे.
  • लग्नापूर्वी लैंगिक संबंधांची मागणी

नवाजच्या पुतणीने दिव्य मराठीसोबतच्या बातचीतमध्ये पुढे सांगितले की, काका मीनाजने लग्नापूर्वी तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. तेव्हा तिने तिचा भावी पती सलमान सिद्दीकीकडे काकांची तक्रार केली. काही काळानंतर सलमान तिला तेथून घेऊन गेला.  

  • सासरच्यांनाही त्रास दिला जातोय

पुतणीने सांगितल्यानुसार, तिने कोर्ट मॅरेज केले असून आता तिच्या सासरच्यांना त्रास दिला जात आहे. ती म्हणाली, “माझ्या लग्नानंतरही माझे वडील, मोठे काका नवाज यांनी सासरच्यांविरुद्ध खोटे खटले दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आतासुद्धा दर सहा महिन्यांनी माझे वडील खोटे खटले दाखल करतात आणि आता माझ्या तक्रारीनंतरही ते काहीतरी करतील हे निश्चित आहे. पण माझ्या पतीची मला खंबीर साथ आहे. शारीरिक शोषणाचे पुरावे माझ्याकडे आहेत”, असे तिने स्पष्ट केले.

  • मोठे काका नवाजुद्दीनने कधीही पाठिंबा दिला नाही

पुतणीने दावा केला की, तिचे मोठे काका नवाजुद्दीनचा तिला कधीच पाठिंबा मिळाला नाही. तिने सांगितले,“माझे मोठे काका नवाजुद्दीन यांना मी माझ्यासोबत घडलेले सगळे काही सांगितले होते. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नवाजुद्दीन मला समजू शकतील असे वाटले होते, पण काका असे माझ्यासोबत नाही करू शकत म्हणत त्यांनी त्या गोष्टीवर पडदा टाकला”, असे ती म्हणाली.  

बातम्या आणखी आहेत...