आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नात्यातील कटुता:नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाचे आरोप, म्हणाली- 'नवाज मुलांना भेटणे टाळायचा, मनोज बाजपेयीसमोर केला माझा अपमान'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया उर्फ अंजना यांच्यातील परस्पर वाद वाढतच आहेत. आलिया सोशल मीडिया आणि विविध मीडिया इंटरव्ह्यूजमधून नवाजवर नवनवीन आरोप करत आहे. अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात आलियाने नवाजविरोधात बर्‍याच गोष्टी उघड केल्या आहेत.

नवाज मुलांकडे दुर्लक्ष करतो :

आलिया मुलाखतीत म्हणाली, "मी आणि नवाज हे गेल्या चार वर्षांपासून वेगळे राहतोय आणि याकाळात मी जेव्हाही त्याला मुलांना भेटायला सांगत होती, तेव्हा तो टाळाटाळीची उत्तरे देत होता. मी याबद्दल मुलांना कधीच काहीही सांगितले नाही, कारण ते आधीच निराश झाले आहेत आणि विचारत असतात बाबा कुठे आहे? ते कुठे शूट करत आहे?'

आलिया पुढे म्हणाली, 'मी त्यांना सांगायचे की ते अमेरिकेत गेले आहेत पण मी किती वर्षे हे केले असते? नवाज मुंबईत असूनदेखील कधीही मुलांना भेटायला आला नाही आणि फक्त बिझी असल्याचे सांगायचा.'

मनोज बाजपेयीसमोर केला आहे अपमान:

आलिया पुढे म्हणाली, मनोज बाजपेयी यांच्यासह काही सेलेब्रिटी आमच्या घरी नेहमी येत असतं. एकदा नवाजने त्यांच्यासमोर माझा अपमान केला होता. मी स्वयंपाक करीत होते आणि नवाजसोबत मला काहीतरी बोलायचे होते, तर तो म्हणाला होता, तुला कसे बोलायचे ते माहित नाही, लोकांसमोर बोलत जाऊ नको.' 

आलियाने मुलाखतीत पुढे सांगितले, जर तो प्रेसला भेटायला जात असेल आणि मीही तेथे उपस्थित असेल तर तो माझ्याकडे थेट दुर्लक्ष करायचा. एक पत्नी म्हणून मला एकांतात किंवा सर्वांसमोर जो आदर मिळायला हवा होता, तो मला कधीही मिळाला नाही. मी बर्‍याच वर्षांपासून हे सर्व सहन करीत आहे, कोणाचाही इतका अपमान करायला नको, की समोरच्याचा जीव गुदमरेल. प्रत्येक वेळी माझ्यावर बिंबवले जायचे की, मी काहीच नाही, मला कसे बोलायचे हे माहित नाही, माझा ड्रेसिंग सेन्स चांगला नाही? या गोष्टी ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा माझा आत्मविश्वास ढासळत होता. मी विचार करत असे की मी कधीही काहीही करण्यास सक्षम आहे की नाही. बोलतांना माझे शब्द अडखळायला लागले होते, असेही ती म्हणाली. 
 
आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे: काही दिवसांपूर्वी ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आलियाने नवाजला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आलियाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, नवाज सध्या उत्तर प्रदेशातील त्यांचे मूळ गाव बुढाणा येथे आहे आणि त्यांनी या नोटीसला काहीही उत्तर दिलेले नाही. जर 15 दिवसांत त्यांच्याकडून उत्तर आले नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...