आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा निर्णय:नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप करणा-या पत्नीला आता नकोय घटस्फोट, म्हणाली - 'आमच्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छिते'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलियाच्या मते, तिला नवजासोबतच्या आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलियाने ईमेल व व्हॉट्सअ‍ॅपवर कायदेशीर नोटीस पाठवत त्याच्याकडून घटस्फोट घेण्याची मागणी केली होती. दोघांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवाज आणि आलिया यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र आता आलियाने आपला निर्णय बदलला आहे. आलियाच्या मते, तिला नवजासोबतच्या आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे.

आलियाने एका मीडिया हाऊसशी बोलताना आपली इच्छा केली आणि म्हणाली की, तिला पुन्हा एकदा नवाजसोबत राहायचे असून घटस्फोट नकोय.

पण आता आलियाने तिचा विचार बदलला आहे. ती म्हणते, “जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मुंबईतील घरी मी एकटे होते. त्या परिस्थितीत नवाजने दोन्ही मुलांची काळजी घेण्यास मला साथ दिली. आता मला या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे.”

आलियाने तिचा घटस्फोटाचा निर्णय मागे का घेतला? याबद्दल तिला विचारले असता तिने खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'गेल्या दहा दिवसांपासून मी कोरोनाशी लढतेय, घरी क्वारंटाइन आहे. या दरम्यान माझी मुलं , 11 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा यांची सर्व जबाबदारी नवाजुद्दीनने घेतली आहे. तो लखनऊमध्ये शुटिंग करतोय, असे असले तरी तो मुलांकडे लक्ष देतोय, त्यांची काळजी घेतोय, इतकेच नाही तर माझीही विचारपूस करतो', त्याचे हे रूप पाहून मला आनंद होतोय', असे आलिया म्हणाली.

पुढे आलिया म्हणाली, 'आमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करु. आम्ही याबद्दल सकारात्मक आहोत,' असेही आलियाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...