आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलेशनशिप:नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटिस, पत्नी म्हणाली - आता मला माझी खरी ओळख मिळाली आहे अंजना आनंद किशोर पांडे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाजुद्दीनकडून अद्याप यावर काहीही उत्तर आलेलं नाही.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. त्याची पत्नी आलिया हिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. नवाजुद्दीनला इमेल आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून 7 मे आणि 13 मे रोजी दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • खरी ओळख परत मिळाली

नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला दहाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आलियाने तिचे नाव बदलल्याचीही माहिती एका मुलाखतीत दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी तिने आलिया हे नाव बदलून अंजना आनंद किशोर पांडे असं नाव ठेवलं आहे. याविषयी ती म्हणाली - 'आता मी पुन्हा माझी खरी ओळख अंजना आनंद किशोर पांडेकडे परत आली आहे. माझ्या फायद्यासाठी मी दुसर्‍याची ओळख वापरत आहे याची पुन्हा आठवण करून देण्याची मला इच्छा नाही."

  • दुस-या लग्नाचा विचार नाही

आलियाने सांगितल्यानुसार, ती आता आपल्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छिते. मात्र दुस-या लग्नाचा तिचा विचार नाही. ती म्हणते, 'मला दुसरं लग्न करायचं नाही. पुन्हा (नवाजबरोबर) सामंजस्याची शक्यता नाही." मात्र, आलियाला आशा आहे की, तिला दोन्ही मुलांचा ताबा मिळेल. ती म्हणते, "मी त्यांना मोठं केलं आहे आणि मला त्यांचा ताब्यात हवा आहे."

  • घटस्फोटाचे कारण

आलियाने सांगितल्यानुसार, “दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात मला विचार करायला खूप वेळ मिळाला. नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं गंभीर आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर 2010 पासून नवाज आणि माझ्यात मतभेद सुरू आहेत. मी प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होती. मात्र आता माझ्याकडून सहन होणार नाही. आत्म-सन्मान म्हणजे खूप काही असतं आणि ते माझं संपलं आहे. संपूर्ण काळात मी एकाकी जगले. त्याचा भाऊ शम्सने अडचणी आणखी वाढवल्या.” 

  • नवाजुद्दीनला पाठवण्यात आली आहे नोटिस

आलियाचे वकील भविन सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवाजुद्दीन यांना 7 मे आणि 13 मे रोजी दोनदा आलिया सिद्दिकी यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे स्पीडपोस्टने नोटीस पाठवणं शक्य झालं नाही. त्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र नवाजुद्दीन यांच्याकडून अजून काही उत्तर आलेलं नाही. माझ्या मते ते फक्त या नोटीसबद्दल मौन बाळगत आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्या नोटीशीत केलेले आरोप काय आहेत हे मी स्पष्ट सांगू शकत नाही. पण इतकंच सांगू शकते की आलिया यांनी नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काही गंभीर आरोप केले आहेत.” लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही कौटुंबिक न्यायालयात रितसर याचिका दाखल करु अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नवाजुद्दीनला पाठवण्यात आलेली नोटिस
नवाजुद्दीनला पाठवण्यात आलेली नोटिस
  • सध्या मुंबईत नव्हे बुढाणा येथे आहे नवाजुद्दीन

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुझफ्फरनगरमधील बुढाणा शहरातील रहिवासी आहे. नवाजुद्दीनची आई मेहरूनिसा सध्या आजारी आहेत. आईला तिच्या गावी यायचे होते. म्हणून नवाझुद्दीन 11 मे रोजी महाराष्ट्र सरकारची परवानगी घेऊन त्याच्या घरी पोचला आहे. त्याच्यासमवेत आई, वहिनी सबा आणि भाऊ फैजुद्दीन होते. घरी पोहोचताच नवाजुद्दीनने आपल्या आगमनाची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती. जिल्हा प्रशासनाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाऊईन केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...