आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलेशनशिप:घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, अंजनाने दिले ट्विटरवर स्पष्टीकरण 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पीयूष पांडेसोबत अंजना - Divya Marathi
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पीयूष पांडेसोबत अंजना
  • नवाजची पत्नी अंजनाचे पीयूष पांडे नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया उर्फ ​​अंजना किशोर पांडेने  एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या वृत्ताचा खंडन केले आहे. बुधवारी तिने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरुन पदार्पण केले आणि मीडियात येत असलेल्या तिच्या अफेअरच्या बातम्यांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अंजनाचे पीयूष पांडे नावाच्या व्यक्तीबरोबर अफेअर चालू आहे.

  • माझ्या फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली: अंजना

अंजनाने एका ट्विटमध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी कोणत्याही माणसासोबत रिलेशनशिपमध्ये नाही. यासंदर्भात मीडिया रिपोर्ट्समध्ये जो दावा केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे. माध्यमातील काही घटकांनी लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आणि अशाप्रकारचे हास्यास्पद दावे करण्यासाठी माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली आहे."

  • 'मी स्वत: साठी उभे रहायला शिकले आहे'

दुसर्‍या ट्विटमध्ये अंजनाने लिहिले की, "मी स्वत: साठी उभे राहणे, बोलणे आणि मुलांसाठी दृढ असणे शिकले आहे. आजपर्यंत मी काहीही चुकीचे केले नाही. म्हणून मला काळजी नाही. पैशाने सत्य खरेदी केले जाऊ शकत नाही.'

  • पीयूष पांडेनेही दिले स्पष्टीकरण

पीयूष पांडेने एका बातचीतमध्ये स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांना नवाज आणि अंजनाच्या घटस्फोटाची माहिती माध्यमांमधून समजली. अंजनाबरोबरच्या त्याच्या अफेअरच्या बातम्यांना त्याने निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते, या प्रकरणात त्याला उगाच ओढले गेले आहे. 

अंजनाच्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलवरील तिच्यासोबतच्या आपल्या फोटोबाबत पीयूष म्हणाला, "हा एका पार्टीचा फोटो आहे ज्यात सुमारे 20 लोक उपस्थित होते. आम्ही सर्वांनी फोटो क्लिक केले. फोटोत तीन लोक असतील आणि जर तो क्रॉप केला गेला, तर लोक हवा तसा दावा करु शकतात."

बातम्या आणखी आहेत...