आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवाजुद्दीनचा घटस्फोट:नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला, भावाने हातही उगारला, पत्नी अंजनाचे गंभीर आरोप  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाजचे सततचे ओडरणे आता सहनशक्तीपलीकडे गेले, असे अंजना म्हणाली.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया उर्फ ​​अंजना किशोर पांडेने त्याला घटस्फोटाची नोटिस पाठवली आहे. या दोघांच्या लग्नाला दहा वर्षांचा काळ लोटला आहे पण लग्न झाल्यापासूनच नवाजसोबत सर्वकाही आलबेल नसल्याचे अंजनाने म्हटले आहे. इतकेच नाही तर नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप तिने लावला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अजंनाने नवाजच्या भावाने तिला मारहाण केल्याचा दावा केला आहे.

  • 'नवाजचे सततचे ओडरणे आता सहनशक्तीपलीकडे गेले'

अंजनाने सांगितले, "त्याने (नवाज) माझ्यावर कधीही हात उगारला नाही. परंतु त्यांचे ओरडणे आणि वाद करणे माझ्या सहनशक्तीपलीकडे गेले आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही माझे मानसिक आणि शारीरिक शोषण केले. त्याचा भाऊ माझ्यावर हात उगारला."

  • पहिली पत्नीसुद्धा याच कारणास्तव निघून गेली

अंजना पुढे म्हणाली, "त्याची आई, भाऊ आणि  बहिणी आमच्यासोबत मुंबईत राहायचे. त्यामुळे मला बर्‍याच वर्षांपासून त्रास सहन करावा लागला. नवाजुद्दीनच्या पहिल्या पत्नीनेही त्यांच्या त्रासाला कंटाळून घटस्फोट दिला होता. सिद्दीकी यांच्या कुटुंबात याआधीच चार घटस्फोट झाले असून हा आता पाचवा घटस्फोट आहे. त्यामुळे घटस्फोटा हा त्यांच्या कुटुंबाचा एक भागच झाला आहे."

  • लग्नाच्या वर्षभरानंतरच त्रास सुरु झाला

नवाज आणि अंजनाच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अंजनाने सांगितल्यानुसार, 'लग्नाच्या वर्षभरानंतरच त्यांच्या नात्यात अडचण निर्माण झाली होती. त्यांचे मला त्रास देणे सुरु झाले होते.पण मी हे कुणालाच न सांगता सर्व सहन केलं. मी परिस्थिती हाताळण्याचा आणि गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.' अंजनाने सांगितले की, नवाज कायमच तिला कमी लेखत होता. तिला लोकांसमोर बोलू देत नव्हता. 

  • 'मुलांना वडिलांची शेवटची भेट आठवत नाही'

अंजनाला घटस्फोटानंतर तिच्या दोन्ही मुलांचा ताबा हवा आहे. तिच्या म्हणण्यानुसार, नवाज मुलांना सांभाळू शकणार नाहीत. ती म्हणते, "इतके मोठे कलाकार असूनसुद्धा काय उपयोग? जर तुम्ही आपल्या पत्नीला आणि मुलांना आदर देऊ शकत नाही, तर तुम्ही एक चांगली व्यक्ती होऊ शकत नाही. माझ्या मुलांना त्यांचे वडील शेवटचे कधी भेटले हेसुद्धा आठवत नसेल. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नवाज मुलांना भेटला नाही. त्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे माझ्या मुलांनाही आता याची सवय झाली आहे. त्यामुळे दोन्ही मुलांचा ताबा मला हवा आहे." अंजना म्हणाली की तिला तिच्या बहिणीचा पाठिंबा आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तिच्या भावाचा मृत्यू झाला होता.

  • नवाजला दोनदा पाठवली आहे नोटीस

अंजनाचे वकील भविन सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवाजुद्दीन यांना 7 मे आणि 13 मे रोजी दोनदा आलिया सिद्दिकी यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे स्पीडपोस्टने नोटीस पाठवणं शक्य झालं नाही. त्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र नवाजुद्दीन यांच्याकडून अजून काही उत्तर आलेलं नाही. जर 15 दिवसांत त्यांच्याकडून उत्तर आले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

  • सध्या मुंबईत नाहीये नवाजुद्दीन

नवाजुद्दीन याच्या कोराेना व्हायरस तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवाज काही दिवसांपूर्वी आपल्या मुजफ्फरनगर येथील बुढाना गावात गेला होता. त्याची आई मेहरुनिसा काही दिवसांपासून आजारी आहेत म्हणून नवाज महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आपल्या घरी आला आहे. त्याच्या सोबत आई, भाऊ फैजुद्दीन, वहिनी सबादेखील सोबत आले आहेत. ते सर्वजण घरी आल्यावर क्वाॅरंटाईन झाले आहेत. नवाजशी बोलणे झाले तर तो म्हणाला, ‘या महामारीत कोण ईद साजरी करणार? मी आपल्या घरी ईद साजरी करायला आलो नसून आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. मी फक्त असे आईच्या प्रेमापाेटी केले. नाहीतर जगातील कोणतीच शक्ती मला क्वाॅरंटाईनमधून बाहेर काढूच शकली नसती.’

बातम्या आणखी आहेत...