आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त बॉलिवूड:नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीचा बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप, आज दाखल केलेल्या तक्रारीवरुन एफआयआर होऊ शकतो दाखल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि फसवणुकीसंदर्भात सविस्तर लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत आता वाढ होताना दिसणार आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ ​​अंजना किशोर पांडेने लेखी तक्रार दाखल करून बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ताज्या माहितीनुसार, आलियाच्या तक्रारीवरून पोलिस आज एफआयआर दाखल करू शकतात.

तक्रार दाखल केल्यानंतर आलियाचे वकील अदनान शेख यांनी निवेदन जारी केले की, "माझ्या क्लायंटने वर्सोवा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीबद्दल सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. लवकरच एफआयआर दाखल होईल अशी अपेक्षा आहे.' भादवी कलम 375, 376 (के), 376 (एन), 420 आणि 493 अंतर्गत तक्रार दाखल केली असल्याची माहिती आलियाच्या वकिलांनी दिली आहे. आलियाने काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.

या तक्रारीवर नवाजुद्दीन सिद्दीकीला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. नवाजुद्दीनचा भाऊ शम्सवरही आलियाने छेडछाड केल्याचा आरोप केला होता. आलिया हे सर्व पैशांसाठी करत असल्याचा दावा शम्सने केला होता. मात्र, एका मुलाखतीत आलियाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

  • आलियाने यापूर्वीही कुटूंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

27 जुलै रोजी आलियाने मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून त्यात तिने नवाजसह त्याची आई आणि 3 भावांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. हे प्रकरण मुंबईतील नसल्या कारणाने ही तक्रार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना येथे हस्तांतरित करण्यात आली. येथे आलियाला तिचा जबाब नोंदवायला जावे लागले होते.

  • नवाज सध्या आपल्या मुळ गावी आहे

कोविड -19 लॉकडाऊनपासून नवाजुद्दीन सिद्दीकी बुढाना येथे आपल्या मूळ गावी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने मुंबईत तक्रार दाखल केल्यानंतर नवजाच्या कुटुंबीयांच्या वतीने त्याचा भाऊ फैजुद्दीन सिद्दीकीने स्पष्टीकरण दिले होते. आलिया आणि आपला भाऊ नवाजुद्दीनचा घटस्फोट झाला असून तिने आपल्या कुटुंबावर खोटे आरोप केल्याचे त्याने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...