आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स' ही निर्मिती संस्था 'समांतर' या मराठी वेब सीरिजनंतर आता 'नक्षलबारी' ही हिंदी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊन येत आहे. अलिकडेच या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पार्थ मित्रा दिग्दर्शित या सीरिजमध्ये जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठी सुरु असलेली चळवळ व व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला लढा दाखविण्यात येणार आहे.
‘नक्षलबारी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेब सीरिज या चळवळीचा आणि लढ्याचा जवळजवळ प्रत्येक कंगोरा समोर आणते. त्यात मग आदिवासी आणि या गावकऱ्यांची त्यांच्या हक्कांपासून होणारी कुचंबना, ज्या नैसर्गिक संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाणे किंवा राजकारणी व उद्योजक यांच्याकडून त्यांच्या हक्काच्या गोष्टींमधील मलिदा उकळला जाणे या सर्व बाबी या मालिकेत येतात. या ट्रेलरमधून ही कथा नेमकी काय आहे, याबद्दलचा ढोबळ अंदाज बांधता येतो आणि त्यामुळे त्यातून प्रेक्षकांची प्रतिक्षा आणखीन ताणली जाते.
‘नक्षलबारी’ ही ‘जीसिम्स’ची पहिली हिंदी वेब सीरिज असून 28 नोव्हेंबर रोजी ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. तर टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘नक्षलबारी’चे चित्रीकरण गोव्यात झाले आहे. ‘एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या मदतीने कंपनीने या मालिकेची निर्मिती पूर्ण केली. या मालिकेमध्ये असलेले आघाडीचे कलाकार आणि या मालिकेचे दिग्दर्शक यांच्यामुळेसुद्धा या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.