आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूली वेड्स:लग्नानंतर नयनतारा आणि विग्नेश यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, हातात हात घालून दिसलं कपल

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन यांनी 9 जून रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघेही बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपतीला पोहोचले. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे, यात नयनतारा पती विग्नेशचा हात हातात धरुन दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नयनतारा पिवळी साडी, नेकलेस आणि मंगळसूत्रात खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे विग्नेश पारंपरिक पोशाखात दिसला. नयनतारा-विघ्नेशचे लग्न चेन्नईजवळील महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये पार पडले. दोघांच्या लग्नाला शाहरुख खान, अजित कुमार, रजनीकांत, कमल हासन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...