आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:9 जून रोजी लग्नगाठीत अडकणार आहेत नयनतारा आणि विघ्नेश सिवन, 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे हे कपल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले

बॉलिवूडमध्ये सनई चौघड्यांचे सूर ऐकू आल्यानंतर आता टॉलिवूडमध्येही लगीनघाई सुरु झाली आहे. अभिनेत्री नयनतारा तिचा प्रियकर आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवनसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 9 जून रोजी महाबलीपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. चेन्नईतील ताज क्लब हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले
नयनतारा आणि विघ्नेश यांनी अलीकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या लग्नाचे आमंत्रणही दिले. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते आणि राजकारणी उधयनिधी स्टॅलिनही उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

कपलची फिल्मी आहे लव्ह स्टोरी
चित्रपटसृष्टीशी निगडीत असल्याने नयनतारा आणि विघ्नेश यांची प्रेमकहाणीही फिल्मी आहे. एकत्र काम करताना हे कपल प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करु लागले. या जोडप्याने 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला होता.

नयनतारा आणि विघ्नेश यांचे वर्कफ्रंट
विघ्नेशचा 'कथुवाकुला रेंडुकधल' हा चित्रपट 28 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल झाला. यामध्ये विजय सेतुपती, नयनतारा आणि सामंथा मुख्य भूमिकेत झळकले. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. विघ्नेशच्या दिग्दर्शनाखाली नयनताराचा हा दुसरा चित्रपट आहे. नयनताराचा 'O2' चित्रपट 17 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर हे कपल त्यांच्या 'एके 62' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होतील. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा विघ्नेशच्या खांद्यावर आहे.

बातम्या आणखी आहेत...