आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयनतारा-विघ्नेश लग्न:लग्नात पोहोचला शाहरुख खान, रजनीकांत आणि कमल हासनसह अनेक सेलिब्रिटी झाले सहभागी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नयनताराच्या लग्नात शाहरुख पोहोचला

बॉलिवूडमध्ये सनई चौघड्यांचे सूर ऐकू आल्यानंतर आता टॉलिवूडमध्येही लगीनघाई बघायला मिळतेय. अभिनेत्री नयनतारा तिचा प्रियकर आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवन याच्यासोबत आज म्हणजेच 9 जून रोजी लग्नबंधनात अडकली आहे. सकाळी साडे आठ वाजताच्या मुहूर्तावर दोघांचे लग्न लागले. हे लग्न चेन्नईजवळील महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. 10 जून रोजी येथेच रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. या रिसेप्शनला साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.

नयनताराच्या लग्नात शाहरुख पोहोचला
शाहरुख खान कोविडमधून बरा झाला असून नयनताराच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो महाबलीपुरमला पोहोचला आहे. लग्नस्थळावरील शाहरुखचे काही फोटो समोर आले आहेत.

शाहरुख आणि नयनतारा 'जवान' चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

शाहरुखसह त्याची मॅनेजर पूजादेखील लग्नात सहभागी झाली आहे. याशिवाय जवान या चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीनेसुद्धा लग्नाला हजेरी लावली आहे.

शाहरुख खानपासून रजनीकांतपर्यंत अनेक सेलेब्स हजेरी लावणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख व्यतिरिक्त, रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सुर्या, कार्ती, विजय सेतुपती आणि समंथा रूथ प्रभू यांच्यासह अनेक मोठे सेलिब्रिटी या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. लग्नात सुरक्षेचा विचार करून पाहुण्यांना एक खास कोडही देण्यात आला आहे.

लग्न तिरुपतीला होणार होते
एका मुलाखतीत विघ्नेशने सांगितले होते की, मी आणि नयनतारा याआधी तिरुपतीमध्ये लग्नाची योजना आखत होतो. पण नंतर आम्ही आमचा प्लॅन बदलला. कारण माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना तिथे घेऊन जाणे खूप अवघड होते. त्यामुळेच आम्ही आमचा विवाह सोहळा चेन्नईजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले
नयनतारा आणि विघ्नेश यांनी अलीकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते आणि राजकारणी उधयनिधी स्टॅलिनही उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

कपलची फिल्मी आहे लव्ह स्टोरी
चित्रपटसृष्टीशी निगडीत असल्याने नयनतारा आणि विघ्नेश यांची प्रेमकहाणीही फिल्मी आहे. एकत्र काम करताना हे कपल प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करु लागले. या जोडप्याने 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला होता.

नयनतारा आणि विघ्नेश यांचे वर्कफ्रंट
विघ्नेशचा 'कथुवाकुला रेंडुकधल' हा चित्रपट 28 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल झाला. यामध्ये विजय सेतुपती, नयनतारा आणि सामंथा मुख्य भूमिकेत झळकले. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. विघ्नेशच्या दिग्दर्शनाखाली नयनताराचा हा दुसरा चित्रपट आहे. नयनताराचा 'O2' चित्रपट 17 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर हे कपल त्यांच्या 'एके 62' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होतील. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा विघ्नेशच्या खांद्यावर आहे.

बातम्या आणखी आहेत...