आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज स्कँडल:दीपिका, सारा, श्रद्धा, रकुलच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासणार, एनसीबीचा निर्णय; सात अभिनेत्यांची चौकशी करण्याची तयारी

मुंबई/नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने या अभिनेत्रींची ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात अनेक तास चौकशी केलेली आहे.

सुशांत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत एनसीबी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर व रकुलप्रीत सिंह यांच्या बँक खात्यांतून झालेल्या व्यवहारांची तपासणी करेल. एनसीबीने या अभिनेत्रींची ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात अनेक तास चौकशी केलेली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या अभिनेत्रींनी ड्रग्जच्या खरेदी-विक्रीसाठी काही व्यवहार केले आहेत की नाहीत हे जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. या अभिनेत्रींनी गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डने केलेल्या पेमेंट्सची तपासणी केली आहे. या प्रकरणात बॉलिवूडचे अनेक मोठे निर्माते आणि सात मोठ्या अभिनेत्यांच्या चौकशीला हिरवी झेंडी मिळाली आहे, असा दावाही सूत्रांनी केला. अभिनेत्री व ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत ज्यांची नावे समोर आली त्यांच्या चौकशीची परवानगी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थानांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.]

  • चौकशीत काय निघाले - गृहमंत्री देशमुख

सुशांत प्रकरणाच्या चौकशीबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सीबीआयकडे तपास सोपवून दीड महिना उलटला आहे. त्यांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser