आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सक्लूझिव्ह:एनसीबीने सांगितले- ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक, पण सेलिब्रिटींची ब्लड टेस्ट झाली नाही, भारती सिंहच्या टेस्टची बातमी चुकीची

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनसीबीने सांगितल्यानुसार, अद्याप रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोणसह इतर कोणत्याही सेलिब्रिटीला क्लीन चीट देण्यात आलेली नाही. - Divya Marathi
एनसीबीने सांगितल्यानुसार, अद्याप रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोणसह इतर कोणत्याही सेलिब्रिटीला क्लीन चीट देण्यात आलेली नाही.
  • एनसीबी म्हणाले - ड्रग्ज प्रकरणात अटक होण्यापूर्वी फक्त नॉर्मल हार्ट चेकअप केले जाते.
  • ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले- एनसीबीने सेलिब्रिटींची ब्लड टेस्ट करायला हवी होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. बॉलिवूडवर ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी शबाना सईद, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपालसह ब-याच कलाकारांची चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र ड्रग्ज प्रकरणी यापैकी कुणाचीही ब्लड टेस्ट घेण्यात आलेली नाही. एनसीबीच्या अधिका-याने याची पुष्टी केली आहे.

सहसा वैद्यकीय तपासणी होत नाही
एनसीबी अधिका-याने सांगितले की, "आरोपींची सहसा ड्रग्जसाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. अटकेपूर्वी नॉर्मल हार्ट चेकअप केले जाते. ड्रग्ज प्रकरणी भारती सिंहची रक्ताची चाचणी केली गेली, मीडियात आलेले हे वृत्त चुकीचे आहे. असे झाले नाही. तिचे नॉर्मल चेकअप झाले होते. दीपिका, सारा, श्रद्धा, अर्जुन यांच्याबाबतीतही असेच झाले. धर्मा प्रोडक्शनशी संबंधित क्षितिज प्रसाद यांचीही रक्ताची चाचणी झाली नाही. ड्रग्ज प्रकरणातील क्षितिज हे 16 वे प्रकरण आहे. त्याला गुन्हा क्रमांक 16/20 असे म्हणतात."

मग आरोपींचा गुन्हा कसा सिद्ध होईल? असे विचारले असता अधिका-याने सांगितले की, “जेव्हापासून एनडीपीएस कायदा (National Domestic Preparedness Consortium amendment 2014) आला आहे, तेव्हापासून कुणाचाही रक्ताची तपासणी झालेली नाही. कदाचित काही प्रकरणांमध्ये राज्याच्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटने काहींची तपासणी केली असावी. मात्र ही सामान्य पद्धत नाही. भारतीचे प्रकरण तसे लहान आहे. तिच्यावर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप आहे. ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या आरोपीची रक्त तपासणी केली जावीच हा रुटीन प्रॅक्टिसचा भाग नाही. "

रक्त तपासणीचा न्यायपालिकेशी काही संबंध नाही
अधिकारी म्हणाले, "रक्त तपासणीचा कंविक्शन, ट्रायल आणि ज्युडिशिअरीशी काही संबंध नाही. जर आरोपींकडून विशिष्ट प्रमाणात अमली पदार्थ जप्त होतात, तर तोही गुन्हा आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या प्रमाणानुसार शिक्षेची तरतुद आहे. काही प्रकरणांमध्ये नक्कीच रक्ताच्या तपासण्या होतील. परंतु, बॉलिवूडच्या बाबतीत, अद्याप असे घडलेले नाही. "

ड्रग्ज प्रकरणातील आरोप दोन प्रकारचे आहेत: उज्वल निकम

या संदर्भात दैनिक भास्करने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, एनसीबीने सर्व सेलिब्रिटींची रक्त तपासणी करायला हवी होती. ते सांगतात, "ड्रग्जच्या बाबतीत दोन प्रकारचे आरोप असतात. एक म्हणजे ड्रग्ज बाळगणे आणि दुसरे म्हणजे ड्रग्जचे सेवन करणे. दीपिका, सारा, श्रद्धा, भारती इत्यादींच्या बाबतीत कंजप्शन केस आहे की पजेशन हे बघावे लागले."

निकम पुढे म्हणाले, "जर ड्रग्जचे सेवन केल्याचे प्रकरण असेल तर रक्त तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, जर फक्त ड्रग्ज बाळगल्याचे प्रकरण असेल तर रक्त तपासणी केली जात नाही. मात्र एखाद्यावर ड्रग्जचे सेवन आणि बाळगल्याचा आरोप असेल तर पोलिस सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाववते. माझ्या मते, रियासह इतर सर्वांची रक्त तपासणी व्हायला हवी होती."

चाचणी करणे अथवा न करणे हे अधिक-यावर अवलंबून असते

निकम म्हणतात, "सेलेब्सचे प्रकरण हे ड्रग्ज व्यसनाचे आहे. जर हा एखाद्याच्या सवयीचा भाग असेल तर त्या संबंधित व्यक्तीने तपासणीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ड्रग्जचे सेवन केले असावे. अशा प्रकरणात रक्त तपासणी करायला हवी. तथापि, चाचणी करावी अथवा नाही हे तपास अधिका-यावर अवलंबून असते.'

निकम म्हणाले, "जर एखाद्याने एक-दोन महिन्यांपूर्वी ड्रग्जचे सेवन केले असेल तर रक्ताच्या चाचणीत काहीही संशयास्पद आढळत नाही. भारती सिंहकडून 86 ग्रॅम अंमली पदार्थ किंवा अर्जुन रामपाल कडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या प्रमाणावरुन शिक्षा निश्चित केली जाईल. माझ्या मते हे पजेशन प्रकरण असून कंजप्शनचे नाही."

अद्याप सेलिब्रिटींनी क्लीन चिट नाही

एनसीबीच्या अधिका-याने सांगितले की, "सध्या ज्या मोठ्या पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अद्याप कोणत्याही सेलिब्रिटीला क्लीन चिट देण्यात आलेली नाही. प्रत्येकाचे आरोपपत्र तयार केले जात आहे. आरोपींनी दिलेले जबाब आणि मिळालेले पुरावे या दोन्ही बाबींची जुळवाजुळव केली जात आहे."

अधिकारी शेवटी म्हणाले, "रिया चक्रवर्ती प्रकरणात हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे की नाही याबाबत दिल्लीत एनसीबीचे डीजी आपापसांत चर्चा करतील. सध्या एनसीबीला या प्रकरणात अधिक पुरावे मिळाले आहेत. त्यावर आरोपपत्र तयार केले जात आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser