आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Karan Johar: Dharma Productions Manager Kshitij Raviprasad NCB Interrogation Today Update | Here's Narcotics Control Bureau (NCB) Latest News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज:करण जोहरच्या कंपनीच्या माजी दिग्दर्शकाला NCB कडून अटक, तत्पूर्वी करण म्हणाला होता - मी ड्रग्ज घेत नाही आणि कोणाला प्रोत्साहनही देत नाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित दिग्दर्शक क्षितिज प्रसादला एनसीबीने 26 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे.
 • दिग्दर्शक क्षितिज रवी प्रसादला शुक्रवारी एनसीबीने ताब्यात घेतले होते.
 • क्षितिजला ओळखत नसल्याचे करण जोहरने म्हटले आहे

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा माजी दिग्दर्शक क्षितिज रवी प्रसाद याला एनसीबीने 26 तासांच्या चौकशीनंतर शनिवारी अटक केली आहे. एनसीबीने शुक्रवारी क्षितिजच्या घरासह एका ठिकाणी छापा मारला होता. त्याच्या घरून कमी प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.

क्षितिजसोबत नाव जुळल्याने करण जोहरने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपले निवेदन जारी केले आहे. करण म्हणतो, "मी ड्रजचे सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही. माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, सहका-यांबद्दल आणि धर्मा प्रॉडक्शनबद्दल जे काही बोलले जात आहे, त्या सर्व गोष्टी निराधार आहेत."

धर्मा प्रॉडक्शनचा सहदिग्दर्शक व क्षितिजचा निकटवर्तीय अनुभव चोप्रा व दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीही शुक्रवारी चौकशी करण्यात आली. त्यांना ड्रग्ज चॅट आणि गांजा-मारिजुआना खरेदीच्या नेटवर्कबाबत प्रश्न विचारण्यात आले.

क्षितिजसोबत नाव जोडल्यानंतर करणने 5 पॉइंट्समधून स्पष्टीकरण दिले आहे

 • 28 जुलै 2019 रोजी माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते, असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले आहे. काही न्यूज चॅनल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझ्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्ज होते, अशी चुकीची रिपोर्टिंग केली जात आहे, असे करणने म्हटले आहे.
 • क्षितिज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा या दोन व्यक्तींचा आणि धर्मा प्रॉडक्शनचा संबंध जोडण्यात येत आहे. त्यांचा आणि माझा किंवा धर्मा प्रॉडक्शनचा कोणताच संबंध नाही. तसेच मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतदेखील नाही.
 • अनुभव चोप्रा हा माझ्या कंपनीचा कर्मचारी नव्हता. मात्र 2011 ते 2013 याकाळात त्याने स्वतंत्रपणे आमच्या कंपनीसोबत दोन प्रोजेक्ट्सवर काम केले होते.
 • क्षितिज रवी प्रसाद नोव्हेंबर 2019 मध्ये धर्मा प्रॉडक्शनची संबंधित कंपनी धर्ममेटिक एंटरटेन्मेंटशी संबंधित होता. तो एका प्रोजेक्टसाठी कराराच्या आधारे कार्यकारी निर्माता होता.
 • लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रॉडक्शनला काही घेणे-देणे नाही.
बातम्या आणखी आहेत...