आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटनुसार एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धा, करिश्मा यांना क्लीन चीट दिली आहे असा दावा केला जातोय की, दीपिका आणि करिश्माने वेगवेगळ्या रुममध्ये प्रश्न विचारण्यात आलेत आणि दोघींनीही प्रश्नांची सारखीच उत्तरे दिली.
अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून क्लीन चीट देण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये या चौघींना क्लीन चीट देण्यात आल्याचा दावा केला जातोय. मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. दैनिक भास्करशी बोलताना मल्होत्रा म्हणाले, "हे चुकीचे वृत्त आहे, आणि आम्ही याचे खंडन करतो."
एका इंग्रजी वेबसाइटने एनसीबीच्या एका अधिका-याच्या (नाव जाहीर केलेले नाही) हवाल्याने म्हटले की, एनसीबीने दीपिका आणि करिश्मा यांच्या विधानांच्या आधारे त्यांना क्लीन चीट दिली आहे.
कथितरित्या शनिवारी झालेल्या चौकशीत दीपिका आणि करिश्मा यांनी एनसीबीला सांगितले की, 2017 मध्ये त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये त्यांनी माल, वीड, हॅश आणि डूब या शब्दांचा वापर विविध प्रकारचे सिगारेटसाठी केला होता.
दोघीही कमी दर्जाच्या सिगारेटला माल, स्लिम आणि उत्तम दर्जाच्या सिगारेटला हॅश आणि वीड म्हणून संबोधत असे. तर जाड सिगारेटला त्यांनी डूब हा कोड वर्ड दिला होता.
या दोघांनाही वेगवेगळ्या रुममध्ये एकसारखे प्रश्न विचारण्यात आले आणि दोघांनीही कोड वर्ड्सचा उल्लेख केला, असाही दावा केला जात आहे. तपास यंत्रणेला त्यांची उत्तरे समाधानकारक वाटली.
क्वान कंपनीशी संबंधित असलेल्या टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रद्धा कपूर यांच्यातील व्हाट्सअॅप चॅट देखील समोर आले होते. यात श्रद्धाने जयाकडे सीबीडी ऑईलची मागणी केली होती. एनसीबीच्या एका अधिका-याचा हवाल्याने असा दावा केला जातोय की, श्रद्धाने सीबीडी ऑईलची मागणी केल्याची कबुली दिली आहे. परंतु हे फक्त बाह्य वापरासाठी होते. त्याचप्रमाणे सारा अली खान हिनेदेखील आपल्या जबाबात ड्रग्जचे सेवन करत नसल्याचे सांगितले आहे.
या रिपोर्टमध्ये एनसीबीच्या अधिका-याचा हवाला देऊन असेही म्हटले आहे की, "सद्यपरिस्थितीत आम्ही फक्त तांत्रिक पुराव्यावर अवलंबून आहोत. कोणत्याही प्रकारची जप्ती झालेली नाही. यापैकी कोणत्याही अभिनेत्रीचा ड्रग पेडलर्सशी संबंध आढळलेला नाही. न्यायालयात त्यांचे जबाब सादर केले जातील."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.