आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन:एनसीबीच्या अधिका-याने सांगितले- चॅट लीक झाल्याने सेलिब्रिटींविरोधातील केस होत आहे कमकुवत, असे झाले नसते तर हे मोठे प्रकरण ठरू शकले असते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपासादरम्यान हे चॅट कोण लीक करत आहेत, याबद्दल एनसीबी हैराण आहे.
  • त्या अधिका-याने सांगितले- चॅट लीक झाल्यानंतर मोठी नावे आणि ड्रग्ज पेडलर्स सतर्क झाले आहेत.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्यासह अनेक सेलेब्सविरूद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा तपास सुरू आहे. परंतु एनसीबीच्या म्हणण्यानुसार सेलिब्रिटी आणि त्यांचे मॅनेजर यांच्यातील चॅट व्हायरल झाल्याने हे प्रकरण कमकुवत बनत आहे. सोबतच चौकशीदरम्यान हे चॅट लीक कोण करत आहेत, असा प्रश्न एनसीबीला पडला आहे.

  • 'चॅट लीक झाल्याने ड्रग्ज गँगस्टर सतर्क झाले आहेत'

दैनिक भास्करसोबत बोलताना एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितले की, "चौकशीदरम्यान ड्रग्ज डिलरसोबत मोठमोठी नावे समोर आली आहेत. एनसीबी त्या दिशेने अगदी जवळ आले होते. आम्ही त्यांना ताब्यात घेणार होतो, मात्र त्याचवेळी हे स्क्रीनशॉट्स बाहेर आले. त्यामुळे ड्रग गुंड आणि मोठी नावे सतर्क झाली आहेत."

  • जर चॅट बाहेर आले नसते तर सेलिब्रिटींविरोधात मोठा खटला बनला असता

अधिकारी पुढे म्हणाले, "जर स्क्रीन शॉट्स बाहेर आले नसते तर सेलेब्रिटींविरोधात मोठा खटला बनला असता आणि त्यानुसार पुढील कारवाई केली गेली असती. परंतु आता हे फक्त मादक पदार्थांचे सेवन केल्याचे प्रकरण बनले आहे. या प्रकरणात जर सेलिब्रिटींनी माफीनामा दिला तर ते सहज यातून बाहेर पडतील त्यांना तुरुंगवास होणार नाही."

  • सेलिब्रिटी ड्रग्जच्या सेवनासोबतच ट्रॅफिकिंगचा एक भाग

एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितले की, "सेलेब्स ड्रग्जच सेवन करतात, हे नाकारता येत नाही. सोबतच ते ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचादेखील एक भाग आहेत. त्यांचे मॅनेजर सेलेब्सच्या मागणीनुसार त्यांना ड्रग्ज पुरवतात. पण प्रश्न हा आहे की, या मॅनेजर्ससाठी ड्रग्जची व्यवस्था कोण करतं? आता परिस्थिती अशी आहे की बाकीचे पॅडलर्स अंडरग्राऊंड झाले आहेत."