आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्ज प्रकरणी मंगळवारी मुंबई हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) एडीजी अनिल सिंह म्हणाले होते की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीचा फारसा संबंध नाही. जेव्हा हे विधान माध्यमात व्हायरल झाले तेव्हा तपास यंत्रणेने स्पष्टीकरण दिले आहे. एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक भास्करला सांगितले की, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही. सोबतच रिया आणि शोविकचा संबंध असलेल्या ड्रग्ज प्रकरणात दीड किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रियाला 10-20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. एनसीबी अधिका-याशी झालेल्या संभाषणाचा काही भाग: -
प्र. अनिल सिंग यांनी कोर्टात सांगितले की, 'सुशांत मृत्यू प्रकरणात रियाचा फारसा संबंध नाही'. याचा अर्थ काय?
उत्तरः ही चुकीची व्याख्या आहे. सुशांतच्या मृत्यूशी आमचा म्हणजे एनसीबीचा काही संबंध नाही. आम्ही वेगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहोत. मृत्यूच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे आहे. आमची केस आणि मुद्दा ड्रग कार्टेलचा आहे. आमच्याकडे ड्रग्ज सिंडिकेटचे प्रकरण आहे. अनिल सिंग यांनीही हेच सांगितले होते, परंतु त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय.
प्र. रियाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीला ड्रग्ज पुरवत असे, ती व्यक्ती हयात नाही. त्यामुळे ड्रग्ज कार्टेल खरोखर अस्तित्वात आहे की नाही ते कसे सिद्ध करेल?
उत्तरः ड्रग कार्टेल एकटा सुशांत नाहीये. आम्ही एकूण 19 लोकांना अटक केली आहे. सुशांतला मुख्य आरोपी बनवून हे प्रकरण चालवले जात नाहीये. इतर जे आरोपी आहेत, ज्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, त्यांची चौकशी सुरु आहे. या लोकांवर आम्ही एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करु.
उर्वरित ड्रग्ज हस्तगत करण्यापासून ते त्यासाठी पेमेंट करणे, आर्थिक मदत पुरवणे, हे गंभीर गुन्हे नाहीत का? जर एखादी व्यक्ती या जगात नसेल, तर इतर आरोपींना सोडायला हवे का? उदाहरणार्थ, अनुज केसवानी, ड्वेन फर्नांडिज, अंकुश अरेना... यांच्याकडून शोविकने ड्रग्ज घेतले होते. हे सर्व छोट्या षडयंत्रांचा भाग नाही. हे मोठ्या सिंडिकेटला सूचित करते.
प्र. या पॅडलर्सनी कोणत्या अभिनेत्यांनी नावे दिली आहेत का?
उत्तर: हा चौकशीचा विषय आहे. यावेळी याबद्दल काही बोलणे योग्य नाही. आमच्याकडे वेळ आहे. तसेच माध्यमांमध्ये एक्स, वाय, झेड लोकांना क्लीन चीट दिली गेली आहे, असे जे म्हटले जात आहे, ते चुकीचे आहे. अद्याप कोणालाही क्लीन चीट देण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे. आम्ही पुढे एक दोन तक्रारी दाखल करणार आहोत. जसजसे चौकशीत पुरावे हाती येतील तसतसे आम्ही पुढील समन्स पाठवत राहू.
प्र. रिया प्रकरणात किती प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे?
उत्तरः ही गोष्ट त्यांच्या बचाव पक्षाच्या वकिलांना देखील माहित नाही. संपूर्ण प्रकरणात कमर्शियल कॉन्टीटी मिळाली आहे. सुमारे दीड किलो चरसचा साठा सापडला आहे. गांजा देखील मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. या प्रकरणात रिया-शोविकला 10 ते 20 वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. हा संघटित गुन्हा आणि सिंडिकेट आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.