आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भास्कर एक्सक्लूसिव्ह:एनसीबी अधिकाऱ्याचा दावा- अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्‍स पुरवायचा, आम्हाला इंटेलीजेंस एजेंसीकडून पक्के पुरावे मिळाले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • A, D, R, S च्या कोड नेममध्ये A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डीनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहे
  • एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले- आमच्याकडे विश्वासार्ह माहिती आहे, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढची पावले उचलणार आहोत

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीत ड्रग्स पेडलर्सने बॉलिवूडच्या चार हिरोंची नावे घेतली आहे. यात शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरियाचा समावेश आहे. यात मोठी माहिती अशी हाती लागली की, अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करतो. आतापर्यंत फक्त अभिनेत्रींची नावे येत होती, आता अभिनेत्यांची नावे यायला लागली आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉलिवूडच्या मोठ्या हिरोंच्या नावाचा खुलासा केला आहे. अधिकाऱ्यासोबत झालेल्या बातचीतची पूर्ण रेकॉर्डिंग भास्करकडे उपलब्ध आहे. मागील दोन दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात हिरोदेखील असल्याची माहिती येत होती. पण, त्यांचे नावे न येता ‘A’, ‘D’ ‘R’ आणि ‘S’ अशी कोड नेम येत होती.

आता हे स्पष्ट झाले आहे की, A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डिनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहेत. अनसीबी अधिकाऱ्यांने सांगितले की, ट्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करायचा किंवा अजूनही करतो.