आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन प्रकरणातील आरोपांवर NCB चे उत्तर:जेव्हा लोक आमच्यावर टीका करत होते, तेव्हा आम्ही एका ऑपरेशनमध्ये बिझी होतो, 1 कोटींचे ड्रग्ज जप्त केले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही एक पारदर्शक तपास यंत्रणा आहे आणि देशाच्या हितासाठी काम करत आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग म्हणजेच NCB च्या मुंबई शाखेने आर्यनला रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. पण या कारवाईवरुन एनसीबीवर राजकीय नेते आणि सोशल मीडियाकडून जोरदार टीका झाली आहे. तपास यंत्रणेवर राजकीयदृष्ट्या प्रभाव पडल्याचा आरोप आहे. पण, ही एक पारदर्शक तपास यंत्रणा आहे आणि देशाच्या हितासाठी काम करत आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

टीका आम्हाला बळकट बनवत आहे
एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आमच्यावर होणारी टीकाच आम्हाला हा देश ड्रग्ज मुक्त करण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने काम करण्यासाठी मजबूत बनवत आहे. टीकाकार आरोप करण्यात व्यस्त होते, आणि आम्ही एक ऑपरेशन करत होतो ज्यात आम्ही एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.' अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही अमली पदार्थांचा धोका दूर करून टीकाकारांच्या टीकेला उत्तर देत आहोत." ड्रग तस्करांना पकडण्यासाठी एनसीबी सातत्याने छापे आणि मोहीम राबवत आहे. आम्ही ड्रग्जच्या प्रकरणात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समुपदेशन करतो. आर्यनच्या समुपदेशनाबद्दल लोक इतके का बोलत आहेत? अशा प्रकरणांमध्ये हे एक सर्वसामान्य बाब आहे.'

एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल
आर्यन खानचे एनसीबीकडून समुपदेशन करण्यात आले होते. तिथे आर्यनने एनसीबीला मोठे वचन दिले असल्याची माहिती समोर आला आहे. तसेच त्याने माझ्यामुळे तुम्हाला गर्व वाटेल, असेही म्हटले आहे.

आर्यनने म्हटले, ' तुरुंगातून बाहेर आल्यावर मी एक चांगला व्यक्ती बनेन. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब लोकांना मदत करेन. तुम्हाला एक दिवस माझा गर्व वाटेल,' असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडेंना दिला आहे.

20 ऑक्टोबर रोजी येईल जामिनावर निर्णय
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामिचा आणि इतर आरोपींनाही 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. सत्र न्यायालय 20 ऑक्टोबरला आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. सध्या आर्यनला तुरुंगात क्रमांक 956 चा बॅच मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...