आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या याचिकेविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात एनसीबीने लिहिले की, रिया आणि शोविक ड्रग्स सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दोन प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात म्हटले आहे की, "व्हॉट्सअॅप चॅट, मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्कमधून रिट्रीव केलेला रेकॉर्ड यासारख्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, ड्रग्जसाठी पेमेंट केले गेले होते. यावरुन रियाने फक्त ड्रग्जसंदर्भात डीलच केली नाही तर ड्रग्जच्या अवैध तस्करीला अर्थसहाय्य दिले हे या पुराव्यांवरुन सिद्ध होत आहे."
प्रतिज्ञापत्रात म्हटले गेले की, रियाने सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी करून ते घरात लपवून ठेवले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, रिया ड्रग्जच्या तस्करीमध्ये सामील होती, याचे भरपूर पुरावे आहेत. याचिकाकर्त्याने (रिया) ड्रग्ज डिलिव्हरी सोपी केली आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड आणि रोख अशा गेटवेची सुविधा दिली.
रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी ड्रग्जच्या तस्करीच्या आरोपाखाली एनसीबीने अटक केली होती. तेव्हापासून ती मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. दरम्यान, दंडाधिकारी व सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यापूर्वी तिला 22 सप्टेंबरपर्यंत कस्टडी देण्यात आली होती. ती नंतर 6 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली.
4 सप्टेंबर रोजी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केली होती. शोविकने आपल्या जबाबात कबूल केले होते की, तो आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून ड्रग्जची देवाण-घेवाण करायचा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.