आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशविरूद्ध एनसीबीने दाखल केली तक्रार, अटकेची टांगती तलवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जविषयीचे संभाषण समोर आले होते. हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशविरूद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी एनसीबीच्या पथकाने करिश्माच्या घरातून 1.8 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले होते. यानंतर, करिश्माला बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. दिवसभर एनसीबीच्या अधिका-यांनी तिची वाट पाहिली. पण ती चौकशीसाठी हजर झाली नाही. यानंतर गुरुवारी तिच्याविरुध्द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

करिश्माच्या घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अत्यंत अल्प प्रमाणात असले तरी, यासाठी तिला अटक केली जाऊ शकते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या या घरातून सीबीडी तेलाच्या तीन बॉटलही जप्त केल्या आहेत. दोषी ठरल्यास तिला एक वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

आहे. यापूर्वी एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली. - फाइल फोटो
आहे. यापूर्वी एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली. - फाइल फोटो

रेड दरम्यान करिश्मा घरी नव्हती

एनसीबीने मंगळवारी करिश्माच्या घरी छापा टाकला. मात्र या कारवाईच्या वेळी करिश्मा घरी नव्हती. त्यामुळे एनसीबीने समन्स तिच्या घराबाहेर चिकटवले होते. करिश्मा ड्रग्ज पॅडलरच्या सतत संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. करिश्माच्या ज्या घरावर कारवाई झाली ती तिचे दुसरे घर आहे. या घरी तिचे येणे-जाणे असते, असे सांगितले जाते. मात्र तिच्या वकीलांनी ती येथे राहात असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. यापूर्वी एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली.

दीपिका आणि करिश्माचे ड्रग्ज चॅट समोर आले होते काही दिवसांपूर्वी दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जबाबतचे संभाषण समोर आले होते. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते. करिश्माशी झालेल्या संभाषणात दीपिकाने 'हॅश' आणि 'वीड' सारखे शब्द वापरले होते. बंदी असलेल्या हॅशला ड्रग्जच्या भाषेत चरस म्हटले जाते.

या दोघींमधील संभाषणात 'हॅश' आणि 'वीड'चा वापर कुणासाठी केला गेला, हे स्पष्ट झाले नाही. यात ड्रग्जच्या प्रमाणाचाही उल्लेख नाही. मात्र दीपिकाच्या अडचणीत भर घालण्यासाठी हे व्हॉट्सअॅप चॅट्स पुरेसे आहेत.