आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आता अमली पदार्थांचा अँगल समोर आला आहे. त्यामुळे सीबीआय आणि ईडीनंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी ) ने आपला तपास सुरु केला आहे. ही टीम मुंबईत (विशेषत: बॉलिवूड) ड्रग्ज नेटवर्कची चौकशी करणार आहे.
एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी गुरुवारी सांगितले की, सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. हे 20 अधिकारी दिल्लीहून मुंबईला पोहोचले आहेत. या टीमचे प्रमुख उपसंचालक (एनसीबी) केपीएस मल्होत्रा आहेत.'
यापूर्वी एनसीबीने बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, जया साहा आणि आणखी एका व्यक्तीविरूद्ध एनसीबीच्या कलम 27 सह नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) अधिनियम 1985 च्या विविध कलम अन्वये गुन्हा दाखल केला. रियाचे ड्रग्जसंदर्भातील काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रियाचे जे चॅट्स समोर आले आहेत, ते सर्व रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी आपल्या फोनमधून डिलीट केले होते. पहिला चॅट रिया आणि गौरव आर्य नावाच्या व्यक्तीतील आहे. गौरव हा ड्रग्ज डीलर असल्याचे सांगितले जात आहे. रिया आणि सुशांत सिंह राजपूत हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सर्वप्रथम एप्रिल 2019 मध्ये समोर आले होते. तेव्हापासून ती सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. 8 जून रोजी तिने अचानक सुशांतचे घर सोडले आणि 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रेस्थित फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.
पहिला चॅट: (रियाने गौरवला केला होता) 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठविलेल्या या चॅटमध्ये रियाने लिहिले की, 'जर आपण हार्ड ड्रग्जविषयी बोलत असून तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही'. हे रिया आणि गौरवचे रिट्रीव वॉट्स अॅप चॅट्स आहेत. त्यांच्यात ही बातचीत 2017 मध्ये झाली होती.
दुसरा चॅट: (रियाने गौरवला केला होता) यामध्ये रिया गौरवला विचारते, 'तुझ्याजवळ एमडी आहे का?' येथे एमडीचा अर्थ 'मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन' असा आहे, हा एक ड्रग्जचा प्रकार आहे. या चॅटमध्ये रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे.
तिसरा चॅट : 8 मार्च 2017 रोजी या चॅटमध्ये रिया गौरवला म्हणाली, "जास्त नशा असलेल्या ड्रग्जविषयी बोलायचे झाल्यात तर मी ते जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेतले होते.' रियाने ड्रग्ज घेतल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर ती गौरवला विचारते, "तुझ्याजवळ एमडी आहे का?" या चॅटमध्ये मिरांडाने स्टफ (ड्रग्ज) संपल्याचे रियाला सांगितले आहे.
चौथे चॅट: (हा चॅट सॅम्युअल मिरांडा आणि रिया यांच्यातील आहे) : 17 एप्रिल 2020 च्या या चॅटमध्ये सॅम्युअल मिरांडा म्हणतो, "हाय रिया, स्टाफ जवळजवळ संपला आहे." "मग मिरांडा रियाला विचारतो, "आपण हे शोविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का?, पण त्याच्याकडे फक्त 'हॅश' आणि 'बड' आहे.' हे दोन्ही सामान्य ड्रग्ज मानले जातात. या चॅटमधून ड्रग्जविषयी रियाच्या भावाला माहित असल्याचे समोर आले आहे. कारण या चॅटमध्ये रियाचा धाकटा भाऊ शोविकच्या नावाचा उल्लेख आहे.
या चार चॅटवरुन रिया 2017 पासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. ताज्या चॅटमध्ये मात्र रिया स्वतःसाठी ड्रग्ज मागवतेय की दुस-या कुणासाठी हे स्पष्ट झालेले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.