आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत केस आणि ड्रग्ज कंपनी:एनसीबीने सांगितले- धर्मा प्रॉडक्शनचा माजी दिग्दर्शक क्षितीजने दिली 3 महिन्यांत 12 वेळा गांजा खरेदी केल्याची कबुली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करमजीतने क्षितीजला गांजा पुरवला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम केलेल्या दिग्दर्शक क्षितीज प्रसादला अटक केली आहे. क्षितीज याच्या चौकशीत एनसीबीला कळले की, त्याने मे ते जुलै 2020 दरम्यान 12 वेळा गांजा खरेदी केला होता. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, करमजीतने क्षितीजला गांजा पुरवला होता.

क्षितीजला त्याच्या अंधेरी वेस्टस्थित घरी अनेक वेळा गांजा पोहोचवण्यात आला होता, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. प्रत्येक 50 ग्रॅम गांजासाठी क्षितीज साडेतीन हजार रुपये मोजत होता. गांजा पुरवणा-या करमजित नावाच्या व्यक्तीला तो हे पैसे देत होता.

आणखी एका सप्लायरला अटक
दरम्यान, क्षितीजच्या घरातून गांजा एनसीबीला सापडला आहे. 12 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या ड्रग पॅडलर अनुष्का अनरेजाने दिलेल्या माहितीनुसार, क्षितीजला ड्रग पुरवणा-याचे नाव संकेत हनुमान चंद पटेल असे आहे. त्यानंतर त्यालादेखील अटक करण्यात आली आहे. चौकशीच संकेत हनुमानाने कबूल केले की त्याने करमजीतच्या सांगण्यावरून अनुष्का अनरेजाला गांजा पुरवला होता.

क्षितीज आणखी 3 दिवस पोलिस कोठडीत राहणार

क्षितीज 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत एनसीबीने सुशांत प्रकरणात ड्रग अँगलमध्ये 20 लोकांना अटक केली आहे. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि दोन स्टाफ सदस्यांकडे चौकशी केली आहे. याशिवाय एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser