आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना NCBचे समन्स, कंगना रनोट स्टारर 'क्वीन' चित्रपटाचा निर्माता मधु मांटेनालाही उद्या चौकशीसाठी बोलावले

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याच आठवड्यात सारा आणि श्रद्धा यांची एनसीबीकडून चौकशी होऊ शकते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. त्यांची याच आठवड्यात चौकशी होऊ शकते. ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमाेन खंबाटा यांनाही बाेलावले जाऊ शकते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात या अभिनेत्रींची नावे घेतली आहेत.

एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकाेणलाही समन्स बजावले जाऊ शकते. ड्रग्जशी संबंधित व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. एनसीबीने साेमवारी सुशांतची मॅनेजर श्रुती माेदी व टॅलेंट मॅनेजर जया साहाची 5 तास चौकशी केली.

रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या आपल्या जबाबात सुशांत सिंह राजपूतने 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रग्जचे सेवन करण्यास सुरुवात केली असल्याचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर 'केदारनाथ'च्या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीम ड्रग्ज घेत होती, शूटिंग संपल्यानंतर सुशांत आणि सारा अली खान दोघांचेही वजन वाढलेले होते असेही रिया म्हणाली आहे. तर छिछोरे या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर श्रद्धा कपूरने सहकलाकारांसोबत सुशांतच्या लोणावळास्थित फार्महाऊसवर पार्टी केल्याचे समोर आले आहे.

  • कंगना रनोट स्टारर 'क्वीन'च्या निर्मात्याला एनसीबीचे समन्स

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता क्वीन या चित्रपटाचा निर्माता मधु मांटेनाचे नावही समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नाव घेतले आहे. बॉलिवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी मधु मांटेनाचे जवळचे संबंध असल्याचे तिने एनसीबीला सांगितले आहे. या प्रकरणी एनसीबीकडून चित्रपट निर्मात्याला समन्स बजावण्यात आल्याने आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उद्या त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मधु मांटेना हा ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचे मधु मांटेनासोबत लग्न झाले होते. मात्र 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. मधु मांटेनाने ‘रण’, ‘गजनी’, ‘मौसम’, ‘क्वीन’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...