आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:NCBच्या टीमने रकुल प्रीत सिंगच्या घरी जाऊन दिले समन्स, आता उद्या दीपिका पदुकोणसोबत होणार चौकशी; यापूर्वी समन्स मिळाला नसल्याचा केला होता बहाणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज रकुलने चौकशीसाठी जाणे टाळले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अनेक अभिनेत्री यात अडकल्या आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह रकुल प्रीत सिंग यांची नावे या प्रकरणात समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या चौघींनाही समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. आज म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी रकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिच्यासह फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा हिलादेखील आज बोलावण्यात आले. सिमोन सकाळीच एनसीबी कार्यालयात पोहोचील. मात्र रकुल प्रीत सिंगने समन्स मिळाला नसल्याचा बहाणा करत चौकशीसाठी जाणे टाळले आहे. एनसीबीने मात्र तिचा दावा फेटाळून लावला आहे.

रकुलच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, त्यांना मुंबई किंवा हैदराबाद येथील घरी कुठलेच समन्स मिळालेले नाही. तर दुसरीकडे एनसीबीने मात्र तिचे दावे फेटाळून लावले आहेत. रकुल प्रीत सिंगला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फोनद्वारे तिला कळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या व्हॉट्सअॅपवरही समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

  • एनसीबीची टीम रकुलच्या घरी पोहोचली

रकुलने आज चौकशीसाठी येण्यास टाळल्यानंतर एनसीबीच्या टीमने पुन्हा एकदा तिला समन्स बजावले आहे. एनसीबीच्या टीमने तिच्या मुंबईतील घरी जाऊन तिला समन्स बजावले आहे. त्यानुसार आता रकुलला उद्या म्हणजे 25 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. उद्या दीपिका पुदकोण हिलादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता दीपिका आणि रकुल यांची एकाच दिवशी चौकशी होईल.

  • सारा आणि श्रद्धा यांनाही हजर व्हावे लागणार

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसर्‍या एफआयआरमध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समाविष्ट आहेत. सारा आणि श्रद्धा यांना 26 सप्टेंबर रोजी हजर राहायचे आहे.