आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यननंतर आता अनन्याच्या अडचणीत वाढ:दोन तास झाली अनन्या पांडेची चौकशी, उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले, NCB ने फोन ताब्यात घेतला; 'मन्नत'मधूनही आर्यनचे इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुख घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्या घरांवर छापा टाकला. एनसीबीने अनन्याला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर अनन्या संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास एनसीबीच्या ऑफिसमधून बाहेर पडली. उद्या पुन्हा एकदा अनन्याला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताना अनन्या
एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताना अनन्या

​​​​​आज झालेल्या चौकशीतून ​आर्यनसह आणखी काही स्टार किड्सची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी अनन्यासह तिचे वडील चंकी पांडे आणि वकील एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजर होते. आज सकाळी एनसीबीचे पथक अनन्याच्या घरी दाखल झाले होते. तिचे घर वांद्रा येथे आहे. एनसीबीने अनन्याचा फोन जप्त केला होता.

अनन्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चौकशीतील अनन्याचा जबाब आर्यनच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण एनसीबीच्या हाती आर्यन आणि अऩन्या यांचे जे व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळाले आहेत, ते सर्वसामान्य नसून त्यात ड्रग्जची खरेदी आणि त्याच्या सेवनाबद्दलचा उल्लेख असल्याचा दावा केला जातोय. एनसीबी मंगळवारीदेखील आर्यनला जामीन मिळणार नाही, याकडे लक्ष देऊन आहे. आर्यन आणि अनन्यानंतर बॉलिवूडचे आणखी काही स्टार किड्स एनसबीच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. मात्र, याचा मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जाच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही. आर्यनची न्यायालयीन कोठडी 21 ऑक्टोबरपर्यंत होती, त्यानंतर एनसीबीने न्यायालयात मुदतवाढ मागितली होती.

अनन्याच्या घराबाहेर पडताना अधिकारी
अनन्याच्या घराबाहेर पडताना अधिकारी

वृत्तानुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. ही नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेच असल्याचे आता समोर आले आहे.

दुसरीकडे कारवाईदरम्यान शाहरुख घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.यावेळी शाहरुखच्या घरी छापेमारी झाली नसून केवळ तपासासाठी काही गोष्टी मागितल्याचे एनसीबी डीडी अशोक जैन यांनी माध्यमांना सांगितले आहे. आर्यनशी संबंधित काही कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी एनसीबीचे पथक आर्यनच्या घरी पोहोचले होते. या पथकाने आर्यनच्या घरी नोटीस दिली. त्यानुसार जर त्याची कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुटुंबाकडे असतील तर ते एनसीबीच्या ताब्यात देण्यात यावी.

शाहरुखच्या घरी जाताना एनसीबीचे पथक
शाहरुखच्या घरी जाताना एनसीबीचे पथक

ड्रग्ज प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर तुरुंगात असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज सकाळी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. वडील आणि मुलाची ही भेट सुमारे 18 मिनिटांची होती. मात्र, जेल प्रशासन नियमानुसार ही भेट केवळ 10 मिनिटांची असल्याचे सांगत आहे.

आर्यनचे अभिनेत्रीसोबतचे ड्रग चॅट एनसीबीला मिळाले

NCB हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले. असेही म्हटले जात आहे की ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला सोडून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...