आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीने उद्या म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तर त्याची लिव्ह इन पार्टनर ग्रॅबिएला हिला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास ग्रॅबिएला एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. एनसीबीने 9 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. या धाडीदरम्यान त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अवैध, बंदी घालण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली होती. याशिवाय अनेक कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली. जवळजवळ सात ते आठ तास हे धाडसत्र सुरु होते. तपास यंत्रणेने यावेळी त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे.
ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचा मेहुणा (ग्रॅबिएलाचा भाऊ) अॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅबलेट मिळाल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळ्यातून अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान एनसीबीला काही मोठे पुरावे मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. आता अॅगिसिलोस जामीन मंजुर झाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे.
दिव्य मराठीने 1 ऑक्टोबर रोजी अर्जुन रामपालच्या ड्रग्ज कनेक्शनविषयीची बातमी दिली होती.
दीपिकाच्या ड्रग्ज चॅटमध्ये अर्जुन रामपालच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होतागेल्या महिन्यात दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.