आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले - आमची बाजू मजबूत आहे आणि आम्ही ती न्यायालयासमोर मांडू

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबी कुणालाही लक्ष्य करत नाहीये

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता, NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीदरम्यान माध्यमांना सांगितले की, या प्रकरणात त्यांची बाजू मजबूत आहे. ते म्हणाले, "हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करु. या प्रकरणी आमची बाजू मजबूत आहे आणि आम्ही ती न्यायालयात मांडू." या कारवाईत एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला इतर अनेकांसह अटक केली होती.

एनसीबी कुणालाही लक्ष्य करत नाहीये

समीर यांनी यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते, “आम्ही कुणालाही लक्ष्य करत नाहीये. आम्ही एका वर्षामध्ये 106 प्रकरणांचा तपास केलाय. मागील दहा महिन्यांमध्ये 300 हून अधिक लोकांना अटक केली. ज्यात ड्रग्स पुरवणारे, त्याचा सौदा करणारे होते. आम्ही दोन कारखानेही उद्धवस्त केलेत ज्यातील एक डोंगरीमध्ये होता. बराच माल आम्ही जप्त केलाय. आर्थिक व्यवहारांसंदर्भातही बरीच माहिती आमच्या हाती लागलीय. वेगवेगळ्या प्रकारचे अंमलीपदार्थ आम्ही जप्त केलेत. 12 वेगवेगळ्या गँग आम्ही पकडल्यात.”

ते पुढे म्हणाले होते ,“आम्ही फार प्रोफेशन आणि सक्षम संस्थेमध्ये काम करतो. आमच्यासाठी कायदा महत्वाचा आहे. त्यामुळेच कोणी तो गुन्हा केलाय किंवा तो कोणत्या स्थानी आहे यापेक्षा कोणीही गुन्हा करुन अंमली पदार्थांविरोधी कायद्याचा भंग केल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल,” असे वानखेडे म्हणाले होते.

एनसीबीला पार्टीच्या तीन दिवस आधी मिळाली होती माहिती
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर एनसीबीने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात हॅशिश, एमडी, कोकेन सापडले आहेत. पार्टीच्या तीन दिवसांपूर्वी एनसीबीला या ड्रग्ज पार्टीची माहिती मिळाली होती. या पार्टीत सामील होण्यासाठी 80 हजार ते लाखो रुपये आकारण्यात आल्याचे उघड झाले होते. या माहितीच्या आधारे, एनसीबीचे काही अधिकारी पार्टीत सामील झाले होते. पार्टीतील आतील दृश्य पाहिल्यानंतर या टीमने बाहेर असलेल्या त्यांच्या पथकाला माहिती दिली होती. यानंतर एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला होता.

बातम्या आणखी आहेत...