आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:करण जोहरच्या वकिलांसह 4 जण चौकशीसाठी NCB ऑफिसमध्ये पोहोचले, 2019 मध्ये झालेल्या 'त्या' पार्टीसाठी मिळाला आहे समन्स

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरी झालेल्या पार्टीसाठी करण जोहरला मिळाली होती क्लीन चीट

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचे वकील आणि त्यांचे तीन सहकारी मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत. गुरुवारी एनसीबीने करण जोहरला समन्स बजावून 2019 मध्ये त्याच्या घरी झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील देण्यास सांगितले. तपास यंत्रणेने करण जोहरला थोडा दिलासा देत आपल्या प्रतिनिधीला चौकशीसाठी पाठवू शकता, असे सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या चौकशीनंतर करण जोहरला स्वतः चौकशीसाठी यावे लागेल की नाही याचा निर्णय एनसीबी घेणार आहे. सध्या करणचे वकील एनसीबीच्या चौकशीला सामोरे जात आहे.

घरी झालेल्या पार्टीसाठी करण जोहरला मिळाली होती क्लीन चीट
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. करण जोहर आणि त्याच्या पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी ड्रग्जचे सेवन केले होते,
असे हा व्हिडिओ पाहून म्हटले जात होते. मात्र, आता एनसीबीने या व्हिडिओची पुन्हा तपासणी केली होती. या तपासानंतर करण जोहरच्या पार्टीत कोणत्याही सेलिब्रिटींनी ड्रग्ज सेवन केले नव्हते, असे
म्हणत करण जोहरला क्लीन चीट देण्यात आली होती.

गुजरातच्या गांधी नगरच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबने करण जोहरच्या या पार्टी व्हिडिओला क्लीन चीट दिली होती. व्हिडिओमध्ये दिसणारी व्हाईट लाईन ट्यूबलाइटचा प्रकाश असू शकतो, असा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. या रिपोर्टनुसार, कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ड्रग्ज सेवन केल्याचे आढळले नाही. तसेच व्हिडिओमध्ये कोणताही चुकीचा पदार्थ किंवा अमली पदार्थ सापडलेला नसल्याने, या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली होती.

2019 मध्ये झाली होती करण जोहरच्या घरी पार्टी
करण जोहरने 2019 मध्ये घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, जोया अख्तर, विकी कौशल, अयान मुखर्जी आणि रणबीर
कपूरसह अनेक जण उपस्थित होते. पार्टीचा व्हिडिओ स्वतः करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पार्टीत ड्रग्जचे सेवन झाल्याचे म्हटले गेले होते.

ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने दिले होते स्पष्टीकरण
‘त्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. आठवडाभर काम करुन दमल्यानंतर थोडा मोकळा वेळ घालवण्यासाठी ती पार्टी होती. मी तो व्हिडिओ शूट केला. जर तिथे भलते सलते काही घडत
असते, तर व्हिडिओ शूट करण्याइतपत मी मूर्ख आहे का?’, ‘ड्रग्जचे सेवन केले असते, तर आम्ही व्हिडिओ शेअर केला तरी असता का?’ असा प्रश्न करण जोहरने उपस्थित केला होता.

विकी कौशलने नेमके त्याच वेळी नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढल्या. खरे तर विकीला डेंग्यू झाला होता, आणि तो तेव्हा कुठे बरा होत होता. तो गरम लिंबूपाणी पित होता. काही जण वाईन पित होते. व्हिडिओ काढण्याच्या पाच मिनिटे आधी माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक-सोशल पार्टी होती. आम्ही गाणी ऐकली, खाल्लं-प्यायलं आणि गप्पा मारल्या, असेही करण म्हणाला होता.

आमदार सिरसा यांनी केली होती तक्रार
या पार्टीमध्ये या सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला होता. त्यांनी करणच्या पार्टीची एनसीबी प्रमुख राकेश
अस्थाना यांच्याकडे तक्रार केली आणि पुरावा म्हणून व्हिडिओ सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...