आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांकाविरोधात बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रियाच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, 8 जून रोजी प्रियांकाने सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्यामध्ये एनडीपीएस कायद्याने बंदी घातलेल्या औषधांचा उल्लेख होता.
दुसरीकडे, एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत प्रकरणात विषप्रयोग करण्यात आला होता, याचा तपास करण्यासाठी व्हिसेरा टेस्ट करणार आहे. 10 दिवसांत याचा रिपोर्ट येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतला विष देण्यात आले होते, असा संशय मेडिकल टीमला आहे. याप्रकरणी मेडिकल बोर्डची पुढची मिटींग येत्या 17 सप्टेंबर रोजी होईल.
सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम आज सलग दुसर्या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी विचारत आहे. अशी बातमी आहे की रियाचा भाऊ शोविक, सुशांतचे हाऊस मॅनेजर मिरांडा आणि हेल्पर दिपेश सावंत यांना समोर बसवून तिला प्रश्नोत्तरे केली जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, आज रियालाही अटक केली जाऊ शकते.
यापूर्वी रविवारी रियाची सहा तास चौकशी करण्यात आली. रिया उशीरा आल्याने प्रश्नोत्तरे पूर्ण होऊ शकली नाहीत, म्हणून आज पुन्हा तिला बोलावण्यात आले आहे. रिया रविवारी दुपारी 12 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.
दरम्यान, ड्रग पॅडलिंगच्या आरोपावरून एनसीबीने अनुज केसवानीला अटक केली आहे. कैझान इब्राहिमच्या चौकशीदरम्यान त्याचे नाव समोर आले. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एसआयटीची स्थापना केली आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक (दक्षिण-पश्चिम विभाग) एम अशोक जैन यांनी सांगितले, "मी तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकत नाही, कारण आपल्या (माध्यमांच्या) सहकार्याने आम्हाला बरीच माहिती मिळत आहे." इतर अधिका-यांनी सांगितले की, एनसीबीला काही फोन चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला आहे, ज्यावरुन बंदी असलेले ड्रग्ज खरेदी केल्याचे समोर आले आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या सुशांतचा हेल्पर दीपेश सावंतने एनसीबीला सांगितले की, त्याने सप्टेंबर 2018 मध्ये सुशांतला मारिजुआना (गांजा) पिताना पाहिले होते. दीपेश म्हणाला-
मुंबईत 1.85 लाखांचे ड्रग्ज जप्त
कैजान इब्राहिमच्या चौकशीच्या आधारे एनसीबीने रविवारी मुंबईत छापा टाकला आणि ड्रग्जचा एक मोठा साठा जप्त केला. एनसीबीने सांगितले की, ड्रग्जसह 1.85 लाख रुपये आणि काही विदेशी चलनही सापडले आहे. अनुज नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात 6 जणांना अटक
1. कैजान इब्राहिम
2. अब्दुल बासित
3. जैद विलात्रा
4. शोविक चक्रवर्ती (रियाचा भाऊ)
5. सॅम्युअल मिरांडा
6. अब्बास लखानी
7. अनुज केसवानी
ड्रग्ज प्रकरणात या 4 जणांची नावे आहेत
1. रिया चक्रवर्ती
2. जया शहा
3. श्रुती मोदी
4. गौरव आर्य
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.