आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणावर राजकारण:राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन म्हणाले- मृत्यूनंतर सुशांत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक चर्चेत आला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
  • सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह भाष्य केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सतत राजकारण सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे, असे ते म्हणाले.

  • ट्रम्पपेक्षा सुशांत अधिक प्रसिद्ध झाला

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये मेमन म्हणाले, “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे. आजकाल त्याला माध्यमांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यापेक्षा मीडियामध्ये त्याची अधिक चर्चा आहे.”

पुढील ट्विटमध्ये ते म्हणाले, “ज्या वेळी कोणत्याही गुन्ह्याचा तपास सुरू असतो त्यावेळी त्याबद्दल माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते. कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक केल्याने न्यायावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो.”

  • संजय राऊत यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सुशांतच्या मृत्यूबाबत वादग्रस्त भाष्य केले आहे. त्यांनी सुशांतच्या वडिलांवर दुसर्‍या लग्नाचा आरोप लावला. यामुळे सुशांत आणि त्याच्या वडिलांचे नातेसंबंध चांगले नव्हते, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यांना 48 तासांत माफी मागायला लावली नाही, नाही तर मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर अशा हजारो नोटिसा रोज येत असतात, माफी मागणार नाही, असे राऊत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...