आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरदार का ग्रँड सन’:नीना गुप्ता आणि अर्जुन कपूर म्हणाले - चित्रपटाचे शूटिंग अविस्मरणीय ठरले, यात आजी-आजोबांची आठवण झाली

ज्योती शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या चित्रपटाविषयी काय म्हणाले नीना आणि अर्जुन...

अर्जुन कपूर आणि नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सरदार का ग्रँड सन’ हा चित्रपट 18 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात नीना यांनी 90 वर्षीय वृद्धेची महिला साकारली आहे. तर अर्जुन त्यांच्या नातवाच्या भूमिकेत आहे. एक नातू आपल्या आजीचे घर पाकिस्तानातून घेऊन येतो, असा चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटासंदर्भात अर्जुन आणि नीना गुप्ता यांच्याशी झालेली ही खास बातचीत...

  • यात तुमच्या दोघांचे आवडते सीन कोणते आहेत ?

नीना गुप्ता- माझे सर्वात आवडते दृश्य ज्यामध्ये मला लाहोरचे देसी दारू पिण्यास मिळते. या व्यतिरिक्त एक दृश्य आहे ज्यामध्ये मी लाहोर येथून आणलेले माझे घर व्हीलचेयरवरुन उठून पाहते.
अर्जुन कपूर- मला अभिनेता म्हणून चित्रपटाची प्रत्येक गोष्ट आवडली. सर्वात आवडते दृश्य म्हणजे यात मी आणि आई बसून बोलतो. ती मला तिच्या लाहोरच्या घराची आठवण सांगते.

  • चित्रपटातील एखादी आठवण सांगा ?

अर्जुन कपूर- पूर्ण चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण मी जेव्हा चित्रपटाची कथा ऐकत होतो तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येत होती. ती अशीच होती. त्यामुळे मी हा चित्रपट निवडला होता.
नीना गुप्ता- आजीची तर काही आठवण नाही. आजीची उणीव माझ्या वडिलांनी भरून काढली होती. मात्र जेव्हा माझे वडील मला सोडून गेले तेव्हा जाणीव झाली की, वडिलांना वेळ द्यायला हवा होता. शूटिंग तर आयुष्यभर करायचीच होती.

  • अर्जुन तुझ्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमासाठी काही प्रेशर होते का ?

कधीकधी आपले जजमेंट आणि आवड प्रेक्षकांशी जुळते आणि कधीकधी ती जुळत नाही. तर कधी-कधी दिग्दर्शक आपल्या कामावर आनंदी असतात, तेव्हा आपण रात्री शांतपणे झोपू शकताे. परंतु जेव्हा आपण अंतिम निकालाबद्दल विचार करताे तेव्हा संपूर्ण प्रक्रिया खराब होते. बाकी मी हा चित्रपट करत असताना माझ्या मनात बॉक्स ऑफिस कलेक्शनची चिंता नव्हती. मी खूप खुश होतो. यात सर्व कलाकारही खुश होते. दिग्दर्शक, निर्मातेही चांगले होते.

  • नीना, चित्रपटात तुमचा जो मेकअप केला आहे, त्यात किती वेळ लागला ?

मला मेकअप करण्यास 2 तास लागायचे. कारण प्रोस्थेटिक्स असायचा. मेकअप काढण्यासाठी दीड तास लागयाचा. बऱ्याच अडचणी यायच्या. दिवसभर थंडीत शूट करणे फार अवघड होते पण हळूहळू सवय झाली होती. मी कधीकधी कॉमेडी करत माझ्या मेकअप आर्टिस्टला चिडवायचे.

बातम्या आणखी आहेत...