आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीना यांची मन की बात:नीना गुप्ता म्हणाल्या, 'मी पैशांसाठी अनेक खालच्या दर्जाच्या चित्रपटांमध्ये काम केले, जेव्हा ते चित्रपट टीव्हीवर येतात तेव्हा माझे डोके फिरते'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या करिअरविषयी मोकळेपणाने भाष्य केले.

नीना गुप्ता सध्या बॉलिवूडमधील आपली यशस्वी सेकंड इनिंग एन्जॉय करत आहेत. 2018 मध्ये 'बधाई हो'नंतर त्यांनी 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'पंगा' आणि 'सरदार का ग्रॅण्डसन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या करिअरविषयी मोकळेपणाने भाष्य केले. त्या म्हणाल्या, माझ्याकडे जेव्हा काम नव्हते तेव्हा मी काही वाईट भूमिका सााकारल्या. असेही काही चित्रपट केले जे कधीही रिलीज होऊ नये यासाठी मी प्रार्थना करायचे.

टेलिव्हिजनवर 'खानदान', 'सांस' आणि 'सिसकी'सारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या नीना म्हणाल्या, 'मी टेलिव्हिजनवर कधीही मला पसंत नसलेले काम केलेले नाही. पण चित्रपटांच्या बाबतीत तसे नव्हते. मी काही चित्रपटांमध्ये असे काम केले, जे मला कधीच आवडले नाही. मला पैशांची गरज असल्याने तुम्ही विचारदेखील करु शकत नाही, असे खालच्या दर्जाचे चित्रपट मी केले आहेत. त्यातील एक चित्रपट टीव्हीवर वारंवार येत असतो. जेव्हा मी स्वतःला त्या चित्रपटात बघते तेव्हा माझे डोके फिरते.'

नीना पुढे म्हणाल्या, 'आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता माझ्यावर जबाबदारी आहे. मला कोणती भूमिका साकारायची आणि कोणती नाही, याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत.'

4 जुलै 1959 रोजी नवी दिल्ली येथे जन्मलेल्या नीना यांनी 'ये नजदीकियां' (1982), 'मंडी' (1983), 'उत्सव' (1984), 'डॅडी' (1989), 'खलनायक' (1993), 'तेरे संग' (2009) आणि 'वीर' (2010) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्या 'दाने अनार के' (2002), 'कितनी मुहब्बत है' (2009) आणि 'दिल से दिया वचन' (2010-2011),‘जस्सी जैसी कोई नहीं’ आणि ‘बुनियाद’सारख्या टीव्ही मालिकांमध्येही झळकल्या आहेत.

विवियन रिचर्ड्स सोबत अफेअर

एक काळ असा होता जेव्हा नीना गुप्ता यांच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत असायच्या. 80 च्या दशकात वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स भारत दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, एका कार्यक्रमात त्यांची भेट नीना गुप्ता यांच्याशी झाली होती. या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले.

नीना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना विवियन विवाहित होते. अफेअरदरम्यान नीना प्रेग्नेंट झाल्या. विवियन आणि नीना यांची मुलगी मसाबा आज फॅशन जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. नीना यांनी 2008 मध्ये विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले. अलीकडेच नीना यांचे ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कामाबद्दल तसेच खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...