आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीना गुप्तांची स्वप्नपुर्ती:'गुडबाय'मध्ये झाली नीना गुप्तांची एंट्री, वठवणार अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीना पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करत आहेत.

अभिनेत्री नीना गुप्ता आता 'गुडबाय'च्या टीममध्ये सहभागी झाल्या आहेत. यात त्या अमिताभ बच्चन आणि दक्षिणेची अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत दिसणार आहेत. चित्रपटात नीना अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका वठवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नीना पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करत आहेत.

याविषयी बोलताना नीना म्हणाल्या, 'विकासने मला या चित्रपटाची कथा जेव्हा ऐकवली तेव्हा मी खुश झाले होते. ही खूपच चांगली स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट रोमांचक असली तर मी दुस-या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. मी बच्चन साहेबांसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे खूप खुश आहे. हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे आहे.'

या चित्रपटाची निर्माती एकता कपूर आहे तर 'सुपर 30' चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. नीना यांनी यापूर्वी एकता कपूरच्या बॅनरच्या वीरे दी वेडिंगमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...