आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायिकेच्या घरी हलला पाळणा:नीती मोहनने दिला मुलाला जन्म, पती निहार पांड्याने गोड बातमी देताना सांगितले - नीती आणि आमचे बाळ निरोगी आहेत

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीती मोहनने बुधवारी मुलाला जन्म दिला आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नीती मोहन आणि तिचा पती अभिनेता निहार पांड्या आईबाबा झाले आहेत. नीती मोहनने बुधवारी मुलाला जन्म दिला आहे. स्वत: निहार पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारने सांगितले की, नीती आणि त्यांचे बाळ दोघेही निरोगी आहेत.

निहार पांड्याने आपल्या पोस्टमध्ये नीतीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये निहारने लिहिले की, 'माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात प्रेम पसरवत आहे.'

आज पावसाळी दिवशी आमही 'SON-rise' पाहिला
निहार पांड्याने पुढे लिहिले, "नीती आणि आमचे बाळ निरोगी आहेत. आज या पावसाळी आणि ढगाळ दिवशी आमच्या घरी ‘सन-राइज’ झाला आहे.' सोबतच निहारने संपूर्ण मोहन आणि पांड्या कुटुंबीयांकडून देव, डॉक्टर, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार मानले आहेत.

नीतीची बहीण शक्ती मोहनने दिल्या शुभेच्छा
निहार पांड्याने ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान, नीतीची बहीण शक्ती मोहन हिनेही निहारच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, "खूप आनंद झाला आहे. नवीन आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन. आता मी मावशी झाले आहे. आता आम्ही आमच्या लहान बाळासोबत धमाल करण्यास सज्ज आहोत."

दुसर्‍या लग्नाच्या वाढदिवशी दिली होती गुड न्यूज
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निहार आणि नीती यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. या खास दिवशी त्यांनी काही फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली होती. नीतीने लिहिले होते , "1 +1 = 3 आई आणि बाबा होणार आहोत. हे सांगण्यासाठी आमच्या दुस-या वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस उत्तम असेल', अशा आशयाचे कॅप्शन नीतीने दिले होते. निहार आणि नीती यांचे 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...