आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट असेल. सेटवरचा एक फोटो पोस्ट करत नीतू यांनी लिहिले, "जुग जुग जियो 'चित्रपटाच्या टीमसह हा शेवटचा दिवस. ही टीम आता एक कुटुंब बनले आहे, मला त्यांची आठवण येईल," असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
मल्टीस्टारर 'जुग जुग जियो'
धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणा-या ‘जुग-जुग जियो’ चित्रपटात नीतू कपूर व्यतिरिक्त वरुण धवन, किआरा आडवाणी आणि अनिल कपूर यांच्या सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2021 मध्ये प्रदर्शित होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.